Hair Care | ‘या’ टिप्स फॉलो केल्याने केसांची होईल जलद वाढ
Hair Care | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे केसांची अधिक काळजी (Hair Care) घ्यावी लागते. कारण हिवाळ्यामध्ये थंड वातावरणामुळे केसांचे आरोग्य बिघडते8 इकीऊ . या ऋतूमध्ये केसांमध्ये कोरडेपणा वाढतो आणि कोंड्याची समस्या निर्माण होते. परिणामी केसात कोंडा वाढल्याने टाळायला वारंवार खाज सुटते. सतत केसांना खाजवल्याने केस गळायला लागतात. अशा परिस्थितीमध्ये केसांना निरोगी ठेवण्यासाठी आणि केसांची गळती थांबवण्यासाठी तुम्ही काही घरगुती पद्धतीचा वापर करू शकतात. या घरगुती पद्धतीचा वापर केल्याने तुमच्या केसांची वाढ देखील जलद व्हायला लागेल. हिवाळ्यामध्ये केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही पुढील पद्धती फॉलो करू शकतात.
आवळ्याचे तेल
हिवाळ्यामध्ये आवळ्याच्या तेलाने केस आणि डोळे दोन्हीही निरोगी राहतात. कारण आवळ्यामध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी, विटामिन ए, विटामिन ई आणि कॅल्शियम आढळतात. त्यामुळे हिवाळ्यात केसांची निगा राखण्यासाठी आवळा एक रामबाण उपाय ठरू शकतो. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात आवळ्याचा समावेश करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही आवळ्याच्या तेलाने तुमच्या केसांची मसाज करू शकतात. नियमित आवळ्याच्या तेलाने केसांची मसाज केल्याने तुम्हाला तुमच्या केसांमध्ये फरक जाणवेल.
अंडी
हिवाळ्यामध्ये नियमित अंड्याचे सेवन केल्याने शरीर उबदार राहते, त्याचबरोबर केसही निरोगी राहतात. अंड्यामध्ये माफक प्रमाणात प्रोटीन आणि बायोटिन उपलब्ध असते. त्यामुळे याच्या वापराने केस मजबूत आणि निरोगी राहू शकतात. केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही दररोज एका अंड्याच्या सेवन करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या केसांना अंडी लावू शकतात. नियमित केसांना अंडी लावल्याने केसांची वाढ चालत होते.
गरम पाण्याचा वापर टाळा
थंडीच्या दिवसांमध्ये तुम्हाला केस गळतीची समस्या टाळायची असेल, तर तुम्ही जास्त गरम पाणी ऐवजी सामान्य तापमानाच्या पाण्याने केस धुतले पाहिजे. कारण जास्त गरम पाण्याने केस धुतल्यावर केसांमध्ये कोरडेपणा वाढायला सुरुवात होते. परिणामी केस गळायला लागतात. त्यामुळे हिवाळ्यामध्ये केसांची निगा राखण्यासाठी सामान्य तापमानाच्या पाण्याने केस धुवा.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | निर्लज्जपणाचा कळस, अब्दुल सत्तारांचा राजीनामा घ्या!, अजित पवार फडणवीसांवर देखील भडकले
- PM Kisan Yojana | सरकारची कडक सूचना! 31 डिसेंबरच्या आधी शेतकऱ्यांनी पूर्ण करा ‘हे’ काम
- Ajit Pawar | कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा, अजित पवारांची सभागृहात मागणी
- R Ashwin | ‘ही’ कामगिरी करणारा रविचंद्रन अश्विन ठरला जगातील दुसराच खेळाडू
- Hritik Roshan | गर्लफ्रेंड सबा आणि मुलांसोबत ऋतिक रोशनचे सुट्टीचे फोटो व्हायरल
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.