Hair Care Tips | कोकोनट मिल्कचे ‘हे’ हेअर मास्क वापरून केस ठेवा निरोगी

Hair Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: केसांची निगा (Hair Care) राखण्यासाठी आपण अनेक पद्धतींचा वापर करत असतो. यामध्ये प्रामुख्याने खोबरेल तेल केसांना लावणे खूप फायदेशीर मानले जाते. कारण खोबऱ्याचे तेल आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असते. हे तेल आपल्या केसांच्या अनेक समस्या दूर करते. पण तुम्ही कधी केसांची निगा राखण्यासाठी नारळाच्या दुधाचा (कोकोनट मिल्क) वापर केला आहे का? नारळाचे दूध आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. कारण यामध्ये प्रोटीन, बी 1, बी 3, बी 5, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, इत्यादी पोषक घटक आढळतात. त्यामुळे नारळाच्या दुधाच्या वापराने केसांवरील अनेक समस्या दूर होऊ शकतात.

कोकोनट मिल्कचे ‘हे’ हेअर मास्क वापरून केस ठेवा निरोगी (Hair Care)

कोकोनट मिल्क आणि आवळा

कोकोनट मिल्क आणि आवळा यांचा हेयर मास्क बनवण्यासाठी तुम्हाला एका भांड्यामध्ये आवळा पावडर घेऊन, त्यामध्ये आवश्यकतेनुसार नारळाचे दूध मिसळावे लागेल. तयार झालेल्या या मिश्रणामध्ये तुम्हाला खोबरेल तेल किंवा इतर कोणत्याही तेलाचे एक ते दोन थेंब मिसळावे लागेल. हा हेअर मास्क तुम्हाला साधारण अर्धा तास केसांवर लावून ठेवावा लागेल. अर्धा तासानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागेल. नियमित या हेयर मास्कचा वापर केल्याने तुम्हाला तुमच्या केसांमध्ये फरक जाणवेल.

कोकोनट मिल्क आणि लिंबू

केसातील कोंडा दूर करण्यासाठी कोकोनट मिल्क आणि लिंबू यांचा हेअर मास्क फायदेशीर ठरू शकतो. यासाठी तुम्हाला अर्धी वाटी कोकोनट मिल्क घेऊन त्यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर हे मिश्रण तुम्हाला साधारण चार ते पाच तास फ्रीजमध्ये ठेवावे लागेल. चार ते पाच तासानंतर तयार झालेले हे मिश्रण तुम्हाला 30 ते 45 मिनिटे केसांना लावून ठेवावे लागेल. नियमित या हेअर मास्कचा वापर केल्याने केसांतील कोंडयाची समस्या दूर होऊ शकते.

कोकोनट मिल्क

केसांना चमकदार आणि मऊ बनवण्यासाठी तुम्ही फक्त कोकोनट मिल्क केसांवर लावू शकतात. कारण कोकोनट मिल्क हे एक नैसर्गिक कंडिशनर आहे. यासाठी तुम्हाला एका भांड्यामध्ये कोकोनट मिल्क घेऊन केसांच्या मुळापर्यंत ते लावावे लागेल. कोकोनट मिल्क केसांना लावण्यासाठी तुम्ही कापसाचा देखील वापर करू शकतात. कोकोनट मिल्क तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटे केसांवर ठेवून नंतर ते धुवावे लागेल.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.