Hair Care Tips | थंडीमध्ये केसातील कोंड्याची समस्या दूर करायची असेल, तर करा ‘या’ घरगुती टिप्स फॉलो
टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा (Winter) आपल्या सोबत येताना अनेक समस्या घेऊन येतो. प्रामुख्याने त्वचा (Skin) आणि केस (Hair) यांच्या समस्यांचा समावेश होतो. हिवाळ्यामध्ये केस कोरडे होतात. त्याचबरोबर केसांमध्ये कोंडा (Dandruff) वाढण्याची समस्या देखील निर्माण होते. हिवाळ्यात कोंडा वाढण्याची समस्या सामान्य आहे. परंतु ती जास्त प्रमाणात वाढली तर ती तुम्हाला त्रास देऊ शकते. केसांमध्ये कोंड्याचे प्रमाण वाढल्यास केस कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक असते. काही घरगुती पद्धती वापरून कोंड्यावर कसे नियंत्रण ठेवता येईल याबद्दल माहिती सांगणार आहोत.
खोबरेल तेल आणि लिंबू
या हिवाळ्यामध्ये केसांमधून कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही केसांना खोबरेल तेलामध्ये लिंबाचा रस मिसळून लावू शकता. यासाठी तुम्हाला एक चमचा खोबरेल तेलामध्ये दोन-तीन थेंब लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यावर हलक्या हाताने त्याला केसांच्या मुळापर्यंत लावा. त्यानंतर टाळूला हलक्या हाताने मसाज करा. नियमितपणे असे केल्याने तुमच्या केसातील कोंड्याची समस्या हळूहळू कमी व्हायला लागेल.
दही
दही आपल्या पोटासाठी खूप फायदेशीर असते, असे आपण नेहमी ऐकत असतो. त्याचबरोबर दही आपल्या केसांसाठी देखील खूप फायदेशीर असते. केसातील कोंडा दूर करण्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये दही घेऊन हलक्या हाताने केसांना दही लावून त्याची मसाज करावी लागेल. त्याचबरोबर तुम्ही दह्यामध्ये बेकिंग पावडर मिसळून देखील हलक्या हाताने टाळूला ती लावू शकतात. नियमितपणे असे केल्याने तुम्हाला तुमच्या केसांमध्ये फरक जाणवेल. त्याचबरोबर याच्या वापराने तुमचे केस मजबूत आणि रेशमी देखील होतील.
तुळशीचे पाणी
केसांवरील कोंड्यापासून त्वरित आराम मिळवण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात. यासाठी तुम्हाला कडुलिंबाची आणि तुळशीचे पाने पाण्यात उकळून घ्यावे लागेल. त्यानंतर ते पाणी कोमट करून त्या पाण्याने डोके धुवावे लागेल. नियमित या पाण्याने डोके धुतल्याने तुम्हाला फायदे दिसायला लागतील.
टीप : वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Gaikwad | “तुम्ही चवताळल्यासारखे, पिसाळल्यासारखे वागत असाल” ; संजय गायकवाड यांचा यशोमती ठाकूरांवर पलटवार
- Periods Hacks | महिलांनी पीरियड्समध्ये चुकूनही करू नये ‘या’ चुका
- India Lockdown | कोरोना काळातील लोकांची व्यथा मांडणारा ‘इंडिया लॉकडाऊन’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
- Raj Thackeray | राहुल गांधींचे सावरकरांबाबत वक्तव्य, मनसे आक्रमक! काळे झेंडे दाखवण्याचे राज ठाकरेंचे आदेश
- Eknath Shinde | राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या काय आहेत निर्णय
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.