Hair Care Tips | ‘या’ पद्धतीने कच्चे दूध केसांवर लावल्यावर होऊ शकतात अनेक फायदे

टीम महाराष्ट्र देशा: दुध (Milk) आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. डॉक्टर पण आपल्याला अनेक वेळा निरोगी राहण्यासाठी दूध पिण्याचा सल्ला देतात. त्याचबरोबर त्वचा (Skin) आणि केस (Hair) ची निगा राखण्यासाठी दुधाचा उपयोग केला जातो. त्वचेसाठी आणि केसांसाठी नॅचरल सोल्युशन म्हणून दुधाकडे पाहिले जाते. त्याचबरोबर काही विशेष पद्धती वापरून जर तुम्ही तुमच्या केसांना कच्चे दूध लावल्यास तुमचे केस गळणे थांबून नवीन केस उगायला सुरू होऊ शकतात. त्यामुळे आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कच्चे दूध केसांना कशाप्रकारे लावता येईल याबद्दल माहिती सांगणार आहोत. या पद्धती वापरून तुमचे केस मऊ आणि चमकदार बनू शकतील.

दुध आणि मध

कच्चे दूध केसांना चमकदार बनवते त्याचबरोबर डोक्यावर साचलेली घाण बाहेर काढण्यासाठी मदत करते. मध आणि दूध यांचा हेअरमास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात दूध घेऊन त्यामध्ये एक दोन चमचे मध मिसळा. बोटांच्या किंवा कापसाच्या मदतीने हे मिश्रण डोक्यावर आणि पूर्ण केसांना चांगल्या प्रकारे लावा. हे मिश्रण डोक्यावर 30 ते 40 मिनिटे ठेवून नंतर साध्या पाण्याने केस धुवा. हा दुधाचा हेअरमास्क नियमितपणे केसांना लावल्यावर तुमच्या केसातील कोरडेपणाची समस्या दूर होईल.

दुध आणि कंडिशनर

केस धुताना कंडिशनरमध्ये थोडे दूध मिसळून ते केसांना लावा. कंडिशनर मध्ये दूध मिसळून केसांना लावल्यास पाच ते सहा मिनिटे डोक्यावर तसेच ठेवा. आणि नंतर डोके धुवा. कंडिशनरमध्ये नियमितपणे दूध मिसळून लावल्यास तुमचे केस लवकर मऊ व्हायला लागतील.

दुध आणि कोरफड

केसांना निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी दूध आणि कोरफड एक सर्वोत्तम उपाय ठरू शकते. यासाठी तुम्हाला कच्चे ताजे दूध घेऊन त्यामध्ये कोरफडीचा गर किंवा कोरफडीचे जेल समान प्रमाणात मिसळावे लागेल. तयार झालेले हे मिश्रण अर्धा तास डोक्याला लावून ठेवा. कोरफड आणि दूध यांचा हेअरमास्क नियमितपणे डोक्याला लावल्यास तुमची केस गळती कमी होऊन तुमचे केस मऊ होतील.

टीप : वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.