Hair Care Tips | केसांना दाट आणि चमकदार बनवण्यासाठी कोरफडीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Hair Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: स्त्री असो वा पुरुष प्रत्येकाला दाट आणि मजबूत केस (Hair) हवे असतात. पण बदलत्या  जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या अभावामुळे केस गळायला लागतात. त्याचबरोबर केसांची योग्य ती निगा न राखल्यामुळे केसांमध्ये कोंडा आणि केस गळण्याची समस्या वाढत जाते. अशा परिस्थितीमध्ये लोक बाजारात उपलब्ध असलेले विविध प्रकारचे केमिकल युक्त उत्पादन वापरतात. पण अनेकदा या उत्पादनामुळे केसाच्या समस्या कमी होण्याऐवजी वाढायला लागतात. त्यामुळे केसांची योग्य निगा राखण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने केसांची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी तुम्ही कोरफडीचा वापर करू शकतात. कारण कोरफडीमध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी आणि अँटी अँक्सीडेंट गुणधर्म उपलब्ध असतात. त्यामुळे कोरफडीच्या वापराने केसांसंबंधीत समस्या दूर होऊ शकतात. केसांना दाट आणि चमकदार बनवण्यासाठी कोरफडीचा पुढील प्रमाणे वापर करावा.

केसांना (Hair) दाट आणि चमकदार बनवण्यासाठी कोरफडीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

कोरफड आणि कांद्याचा रस

कोरफड आणि कांद्याचा रस केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. याच्या नियमित वापराने केसांच्या संबंधित अनेक समस्या दूर होऊ शकतात. यासाठी तुम्हाला चार-पाच चमचे कांद्याच्या रसामध्ये दोन चमचे कोरफड जेल मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला या मिश्रणाने टाळूला चांगली मसाज करावी लागेल. मसाज झाल्यानंतर तुम्हाला हे मिश्रण एक ते दोन तास डोक्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या नियमित शाम्पूने केस धुवावे लागेल.

कोरफड आणि आवळा

कोरफडसोबतच आवळा केसांसाठी खूप फायदेशीर असतो. कारण आवळ्यामध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म आढळतात. हे गुणधर्म केसातील कोंडा दूर करून केसांच्या अनेक समस्या दूर करतात. यासाठी तुम्हाला दोन ते तीन चमचे कोरफड जेल आवळा पावडरमध्ये मिक्स करून घ्यावे लागेल. आवळा पावडर नसेल, तर तुम्ही एक आवळा बारीक करून त्यामध्ये मिसळू शकतात. त्यानंतर तुम्हाला या मिश्रणाने टाळूवर लावून चांगली मसाज करावी लागेल. मसाज झाल्यानंतर हे मिश्रण तुम्हाला एक तास केसांमध्ये लावून ठेवावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमचे केस फक्त पाण्याने धुवावे लागेल.

कोरफड आणि मेथी दाणे

केसांच्या वाढीला चालना देण्यासाठी तुम्ही कोरफड आणि मेथी दाण्याचा उपयोग करू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे लागेल. त्यानंतर सकाळी त्याची पेस्ट करून त्यामध्ये दोन ते तीन चमचे कोरफड मिसळावी लागेल. हे मिश्रण तयार झाल्यावर त्याने टाळूला मसाज करावी लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण एक तास केसांना लावून ठेवावे लागेल. एक तासानंतर तुम्हाला तुमचे केस नियमित शाम्पूने धुवावे लागेल.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या