Hair Care Tips | केसांमध्ये व्हॉल्युम निर्माण करण्यासाठी करा ‘या’ टीप्स फॉलो

Hair Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: केस (Hair) पातळ असले तर केसांचे सौंदर्य कमी होते. त्यामुळे केसांना व्हॉल्युम देण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारचे उत्पादने वापरत असाल. पण या उत्पादनामध्ये रसायन असल्यामुळे केसांवर दुष्परिणाम होण्याचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी नेहमी नैसर्गिक पद्धतीचा वापर केला पाहिजे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात आणि जीवनशैलीमध्ये काही बदल करू शकतात. त्याचबरोबर काही घरगुती गोष्टींचा वापर करून केसांची काळजी घेतल्या जाऊ शकते. केसांमध्ये व्हॉल्युम निर्माण करण्यासाठी तुम्ही पुढील घरगुती गोष्टी वापरू शकतात.

कोरफड

कोरफड त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्याचबरोबर कोरफड आपल्या केसांसाठी देखील उपयुक्त ठरू शकते. कोरफडीचा गर केसांवर लावल्याने केसांना व्हॉल्युम मिळतो. त्याचबरोबर नियमित केसांना कोरफड लावल्याने केसांना कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. त्यामुळे केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही केसांना कोरफड लावू शकतात.

आवळा

आवळा केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण यामध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी आढळून येते. त्यामुळे नियमित आवळ्याच्या उपयोगाने केस निरोगी राहू शकतात आणि केसांमध्ये व्हॉल्युम निर्माण होऊ शकतो. यासाठी तुम्ही आवळायुक्त उत्पादनांचा वापर करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आहारात आवळ्याचा समावेश करू शकतात.

कांद्याचा रस

कांद्याचा रस केसांसाठी खूप फायदेशीर आहे. याच्या नियमित वापराने केस मुळापासून मजबूत होतात. यासाठी तुम्हाला कांदा किसून त्याचा रस काढून दहा ते पंधरा मिनिटे केसांवर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस सध्या पाण्याने धुवावे लागेल. नियमित केसांना कांद्याचा रस लावल्याने केस निरोगी राहू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या