Halloween 2022 | नक्की काय आहे हॅलोवीन सण, जाणून घ्या

टीम महाराष्ट्र देशा: हॅलोवीन (Halloween) या सणाची चर्चा सध्या जास्त होत आहे, कारण साऊथ कोरियाची (South Korea) राजधानी सेल (Seou)l मध्ये हॅलोवीन पार्टी मध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमध्ये लाखो लोक जखमी झाले असून अनेक बेपत्ता आहेत. दरम्यान, हॅलोवीन हा सण जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. साऊथ कोरिया मधील या घटनेनंतर हॅलोवीन सण अनेक लोकांना माहीत झालेला असून बऱ्याच लोकांना त्याबद्दल अधिक माहिती आहे. पण ज्यांना अजूनही हॅलोवीन बद्दल माहित नाही त्यांना आम्ही या बातमीच्या माध्यमातून हॅलोवीन बद्दल अधिक माहिती सांगणार आहोत.

सर्वप्रथम हॅलोवीन Halloween कुठे साजरा केला जायचा ?

आजच्या काळात हॅलोवीन जगभरात साजरा केला जातो. परंतु हॅलोवीन या सणाची सुरुवात सर्वप्रथम आयर्लंड आणि स्कॉटलंड मध्ये झाली होती. पण आता हॅलोवीनची लोकप्रियता जगभरात वाढत चालली असून अनेक ठिकाणी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

हॅलोवीन कधी साजरा केला जातो ?

31 ऑक्टोबर रोजी हॅलोवीन हा सण जगभरात साजरा केला जातो. सेक्टील कॅलेंडरनुसार, हा वर्षाचा शेवटचा दिवस मानला जातो. हॅलोवीन हा सण प्रामुख्याने ख्रिश्चन धर्माचे लोक साजरा करतात. पण सध्याची हॅलोवीन बद्दल लोकप्रियता वाढत चालली असून सर्व धर्माचे लोक हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.

हॅलोवीन दिवशी भीतीदायक कपडे का घातले जातात ?

हा सण साजरा करण्यासाठी लोक स्पेशल हॅलोवीन ड्रेसेस परिधान करतात. हॅलोवीन ड्रेसेस म्हणजेच भीतीदायक कपडे आणि भीतीदायक मास्क आणि मेकअप लोक करतात. शेतकऱ्यांचा असा विश्वास होता की, पिकांच्या कापणीच्या काळात भूत, प्रेत आणि दुष्ट आत्मा पृथ्वीवर येऊन, पिकाचे नुकसान करू शकतात. त्यामुळे लोक भीतीदायक कपडे घालून त्यांना पळवून लावण्यासाठी असा पोशाख परिधान करतात. तर, या कपड्यांबद्दल अनेक वेगवेगळ्या कथा प्रसिद्ध आहेत.

हॅलोवीन Halloween कसा साजरा करतात ?

हॅलोवीनच्या दिवशी लोक एकमेकांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा आणि मिठाई देतात. या दिवशी लोक भोपळ्याला नाक, तोंड आणि डोळे काढून त्याची एक भीतीदायक मूर्ती तयार करून त्यामध्ये मेणबत्ती ठेवतात. हा सण 31 ऑक्टोबरच्या आधीच सुरू होऊन लोक त्याच्या वेगवेगळ्या पार्ट्या आयोजित करतात. हॅलोवीन पार्टीस मध्ये लोक भीतीदायक कपडे आणि मेकअप परिधान करून येतात. या कपड्यांना हे नवीन कॉस्च्युम असे म्हटले जाते.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.