InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

ब्लॉग: हॅप्पी बर्थडे केपी

- Advertisement -

क्रिकेटविश्वात खुप कमी वेळात अफाट प्रसिद्ध पावलेला खेळाडू म्हणजे इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पिटरसन. मला नक्की आठवत नाहीय पण मी सहावी-सातवीत शिकत असताना केविन पीटरसनच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर आला होता.तेव्हा एका सामन्यात पीटरसन आणि युवराजमध्ये काही कारणास्तव भांडण झाल होत. गप्प राहील तो पीटरसन कसला. त्यानंतर लगेच दुसऱ्या बॉलला केविनने असा काही फटका मारला की संपूर्ण क्रिकेटविश्व त्या फटक्याची चर्चा करू लागला. त्याच फटक्याला आपण अल्टी-पल्टी फटका म्हणून ओळखू लागलो. तेव्हापासून मी तर या खेळाडूचा अक्षरशः मोठा चाहता झालो.

पीटरसनचा जन्म हा आफ्रिकेत झालाय हे खूप कमी लोकांना माहित आहे. क्रिकेटच्या ओढिने तो आफ्रिकेतून इंग्लंडला पोहचला आणि त्याने आपल आतंरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा स्वप्न साकार केलं.

- Advertisement -

खूप कमी वेळेत या खेळाडूने अफाट यश आणि नाव कमवल. आज पीटरसनचे करोडो चाहते पूर्ण जगात आहेत. पीटरसन हा गेली काही वर्ष आतंरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसला तरी जगभरात चालणाऱ्या विविध टी२० स्पर्धामध्ये तो भाग घेत असतो. वय वाढत असतानापण केविन आजही आपल्या खेळीने सामन्याच चित्र बदलण्याची ताकद ठेवतो.
मी १०वीला असताना इंग्लिशच्या तोंडी परीक्षेत केविन पीटरसनवरच बोललो होतो आणि त्यात मला पैकीच्या पैकी गुण भेटले होते. केविन पीटरसन याने  आतापर्यंत १३६ एकदिवसीय सामन्यात ४४४० धावा केल्या आहेत तर १०४ टेस्ट सामन्यात ८१८१ धावा केल्या आहेत. त्याने २००४ साली झिम्बाब्वे विरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले होते. अशा ह्या आक्रमक आणि सर्वांच्या आवडत्या खेळाडूला ३७ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्च्छा.

सचिन आमुणेकर यांचा केविन पीटरसनवरील ३७व्या वाढदिवसानिमित्त खास ब्लॉग

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.