अजित पवारांच्या मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, म्हणाले…

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज 61 वा वाढदिवस आहे. कोरोना पार्श्वभूमी आणि राज्यातील पूरस्थितीमुळे वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. उद्धव ठाकरे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

उद्धवजींच्या रूपाने राज्याला आणि महाविकास आघाडीला सक्षम,समर्थ सर्वांना सोबत घेऊन जाणारं कुशल नेतृत्वं लाभले आहे. अशी कौतुकाची थाप देत मुख्यमंत्री ठाकरेंना दीर्घायुष्य लाभण्याची प्रार्थना केली आहे.

तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य कोरोनाविरुद्धचा लढा निश्चितंच जिंकेल. पुरोगामी,प्रगत विचारांचा महाराष्ट्र पुन्हा एकदा देशातील,जगातील अव्वल राज्य बनण्याचा विश्वास मुख्यमंत्री ठाकरेंवर दाखवत अजित पवार यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा