अदिती गोवित्रीकरने अशा पद्धतीने दिल्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

बॉलिवूड अभिनेत्री अदिती गोवित्रीकर एक अभिनेत्री, सुपर मॉडेल व सायकॉलॉजिस्ट आहे. ती मानसिक समस्यांविषयी समाजात जागरूकता करत असते. त्यासाठी तिने देशातल्या बऱ्याच शहरात व गावात जाऊन वर्कशॉप्स घेतले आहेत. बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रेटींना मानसिक ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी मदत केली आहे.
काही दिवसांपूर्वी अदिती गोवित्रीकरच्या वैयक्तिक आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला होता. तिच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. तिचे वडील पनवेलमधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेत होते. त्यावेळी अदितीने कुटुंबासोबत ठाम उभी होती.

मलिंगाने काहीही शिकवलं नाही ! – जसप्रीत बुमराह

वडीलांच्या निधनाला काही दिवस उलटले असून तिची बहिण आरझूच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अदितीने सोशल मीडियावर तिला शुभेच्छा देत एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिले की, ही वेळ आपल्यासाठी सोप्पी नाही. वडिलांना गमावले हे आपल्यासाठी खूप धक्कादायक होते. मला अभिमान वाटतो की अशा कठीण काळात तू खंबीर आधारस्तंभ बनून कुटुंबाला आधार दिला. एक सुंदर स्त्री जी आतूनही सुंदर आहे. आमच्या आधार स्तंभाला हार्दीक शुभेच्छा.

…आणि रणवीर दीपिकाला म्हणाला, ‘मला मारून टाक’ !

अदितीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने ‘पहेली’ व ‘दे दना दन’ व बऱ्याच सिनेमातून रसिकांचे मन जिंकले आहे. अदिती “परछाई” आणि “३७७ ऍबनॉर्मल” या वेब सिरीज मध्ये पण दिसले आहे. ह्या व्यतिरिक्त अभिनेत्री अदिती गोवित्रीकर कुणाल कपूर आणि अमाईरा दस्तूर बरोबर “कोई जाने ना” ह्या चित्रपटात दिसणार आहे आणि “द ग्रे स्टोरीस” ह्या वेब सिरीज मध्ये किकू श्रद्धा आणि हितेन तेजवानी बरोबर स्क्रीन स्पेस शेर करताना लवकरच दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.