InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

हार्दिक पटेल म्हणतात… भाजपने पाटीदार समाजाच्या आरक्षणाचाही निर्णय घ्यावा

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने गुजरातमध्ये सत्तेत असणारी भाजपा असाच निर्णय पाटीदार समाजाबद्दल का घेऊ शकत नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे. कालच महाराष्ट्र सरकारने नोकरी आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केल्यानंतर हार्दिकने हे मत मांडले आहे.

‘गुजरातमध्ये पाटीदारांचे कोणतेही सर्वेक्षण करण्यात आले नाही. असे सर्वेक्षण केले तर राज्यामध्ये पाटीदार हे सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले असल्याचे सिद्ध होईल’ असे उत्तर हार्दिकने दिले आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.