विक्की कौशल आणि कॅटरीनाच्या नात्याबद्दल हर्षवर्धन कपूरने केला खुलासा

मुंबई : बॉलीवुड अभिनेता विक्की कौशल आणि कॅटरीना कैफ यांच्या रिलेशनशिपची चर्चा सध्या जोरदार रंगत आहे. विक्कीला अनेकदा कॅटरीनाच्या घराबाहेर स्पॉट करण्यात आले आहे. मात्र, दोघांनी अद्याप आपल्या रिलेशनबद्दल अधिकृतरित्या माहिती दिली नाहिये. पण आता यावर सोनम कपूरच्या भावाने म्हणजेच हर्षवर्धन कपूरने खुलासा केला आहे.

एका मुलाखती दरम्यान हर्षवर्धन कपूरला अफवांबद्दल विचारण्यात आले की विक्की आणि कॅटरीना एकमेकांना डेट करत आहेत? त्याने उत्तर दिले की,”होय हे खरं आहे.” त्यानंतर बावचळून पटकन म्हणाला, ”हे सांगून मी कोणत्या अडचणीत तर सापडणार नाहीए ना?” हर्षवर्धनचं हे उत्तर ऐकून विकी आणि कतरिनाच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी विकी कतरिनाच्या घरी गेला होता. याचा एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मागील वर्षी लॉकडाउनमध्ये विकी कतरिनाच्या घरी असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर विकीने त्याला कोरोना झाल्याची घोषणा करताच दुसऱ्या दिवशी कतरिनानेदेखील तिला कोरोना झाल्याचे सांगितले होते. सगळ्या घटनांनंतर चाहत्यांनी विकी आणि कतरिनामध्ये नक्की काय नातं आहे? हे शोधायला सुरुवात केली होती.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा