हर्षवर्धन सदगीरच्या खांद्यावर ‘महाराष्ट्र केसरी’ची मानाची गदा

नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरणे शेवटच्या दीड मिनिटात पट काढण्याचा प्रयत्न करून मिळवलेल्या १ गुणच्या जोरावर शैलेश शेळकेचा २-१ गुणांनी पराभव करून अमनोरा महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपले नाव कोरले. अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या अंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील असलेल्या या दोन्ही मल्लानी आज असंख्य कुस्ती शौकिनांची निराशा केली. या लढतीत शैलेश शेळकेला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले.

अचंता शरत कमल याच्या ऑलिम्पिक मोहिमेला मिळाले बळ

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अमनोरा तर्फे म्हाळूंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ‘६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे’ची आज सांगता झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक, माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि महाराष्ट्र केसरी कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ही गदा विजेत्याला प्रदान करण्यात आली. दोन्ही मल्ल एकाच तलमीचे असल्यामुळे विजेत्या हर्षवर्धनने आपला जिगरी यार व आजच्या अंतिम लढतीचा प्रतिस्पर्धी शैलेशला खांद्यावर उचलून घेत स्टेजला फेरी मारत आनंद व्यक्त केला.

Loading...

हर्षवर्धन हा एमएच्या द्वितीय वर्षात शिकत असून, राज्यशास्त्र विषयी घेतला आहे. पाच वर्षापासून तो आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल येथे वस्ताद अर्जुनवीर काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लविद्येचे धडे गिरवत आहे. यावर्षी शिर्डी येथे झालेल्या २३ वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारात त्यांनी पदक मिळवलेले आहे. तसेच वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा हरियाणा येथे सुद्धा त्याने पदकाची कमाई केली आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.