…नाही तर मराठा समाज वंचित आघाडीसोबत जाईल – हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी तब्बल 2 लाख 83 हजार मते मिळाली होती. मला ही मते मराठा समाजाची मिळाली असल्याचे हर्षवर्धन जाधव म्हणाले.

तसेच मराठा आरक्षणाचा कायदा केंद्रात पास केला नाहीतर मराठा समाज विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडी सोबत जाईल, असे मत देखील हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केले आहे. ते एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

हर्षवर्धन जाधव म्हणाले की, मराठा आरक्षणावरून वंचित आघाडी सोबत जावं ही मागणी मला तळागाळातुन येत आहे. यासाठी भाजप- शिवसेना सरकारने जर एका महिन्यात यावर ठोस निर्णय घेतला नाही तर लवकरच प्रकाश आंबेडकर यांना भेटणार आहे. औरंगाबाद लोकसभेत 2 लक्ष 83 हजार मतं ही मराठा समाजातील मिळाली आहेत. जर मराठा आरक्षण कायदा झाला नाहीतर मराठा समाज वंचित आघाडीसोबत दिसेल.

Loading...

याआधी देखील सरकारने मराठा आरक्षणाचा अध्यादेश न काढल्याने शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.