InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी राज ठाकरेंच्या घरावर छापा मारून दाखवावा’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभा निवडणूक लढवणार नाहीयेत. असे असले तरीही, राज ठाकरे संपुर्ण महाराष्ट्रात भाजपविरोधात प्रचारसभा घेत आहेत. मनसे लोकसभा निवडणूक लढवत नसल्याने या सभांचा खर्च कोणत्या पक्षाकडे टाकायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भाजप नेत्यांनी हा खर्च आघाडीच्या उमेदवारांच्या खात्यात टाकण्याची मागणी केली होती. यावर उत्तर देताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी जर सरकारमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरावर छापा मारून दाखवावा, असे आव्हान सरकारला केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply