‘स्वतःला संताजी-धनाजी म्हणून घेणाऱ्या प्रसाद लाड यांचे मुबंई बँकेतील पराभवाने मानसिक संतुलन बिघडले आहे का?’

मुंबई : राज्यात जिल्हा बँकांच्या निवडणुकांवरून राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच मुंबै बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युती करत भाजपचे असलेले अध्यक्षपद आपल्याकडे खेचले. या निवडणुकीत अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सिद्धार्थ कांबळे यांची निवड झाली आहे. तर, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला मात्र पराभव स्वीकारावा लागला.

भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवाराला समसमान मत पडल्यामुळे ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. यात भाजपचे उमेदवार विठ्ठल भोसले यांची उपाध्यक्षपदासाठी निवड झाली. युती करूनही उपाध्यक्षपद हातातून गेल्याने हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. मात्र यानंतर राष्ट्रवादीने शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रम केला अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खेळीमुळे मुंबै बँकेवरील प्रवीण दरेकरांचं वर्चस्व संपुष्टात आलं.

तर अध्यक्षपद निवडणुकीत प्रसाद लाड यांचा पराभव झाला. त्यांनंतर प्रसाद लाड यांच्या नाराजीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. त्याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस हे आमचे कुटुंब प्रमुख, आमचे दैवत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर नाराज होऊ शकत नाही. प्रवीण दरेकर आणि मी संताजी, धनाजीची जोडी महाराष्ट्राला मिळाली आहे. सरकारही या जोडीला घाबरतं, अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिलीय.

यानंतर प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘स्वतःला संताजी-धनाजी म्हणून घेणाऱ्या प्रसाद लाड यांचे मुबंई बँकेत भाजपचा झालेल्या पराभवाने मानसिम संतुलन बिघडले आहे का? तुम्ही संताजी-धनाजी मग नेमके छत्रपती शिवाजी महाराज कोण?’ असा सवाल रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्वीट करत केला आहे. यासोबतच त्यांनी वाचळवीर आणि शिवद्रोहीभाजप असे हॅशटॅगही वापरले आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा