Hasan Mushrif | साडे नऊ तास कसून चौकशीनंतर ईडीचं हसन मुश्रीफांना समन्स
Hasan Mushrif | कोल्हापूर : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना ईडीने समन्स बजावलं आहे. ईडीकडून गेल्या दीड महिन्यापासून हसन मुश्रीफ यांच्याविरोधात कारवाई केली जात आहे. या दीड महिन्यात ईडी अधिकाऱ्यांनी 2 वेळा हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाडी टाकल्या. ईडीच्या पथकाने आज सकाळीच मुश्रीफांच्या घरी छापा मारलेला.
साडे नऊ तास कसून चौकशी
आज झालेल्या छापेमारीमध्ये मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांची कागलमधील निवासस्थानी तब्बल साडे नऊ तास कसून चौकशी करण्यात आली. अधिकारी मुश्रीफ यांच्या निवासस्थानातून 4 वाजून 35 मिनिटांनी बाहेर पडले. तब्बल साडेनऊ तास ईडीचे पथक मुश्रीफांच्या घराची झाडाझडती घेत होते. ईडीचे हे पथक दुपारी चार वाजेच्या सुमारास मुश्रीफांच्या घराबाहेर पडले.
हसन मुश्रीफ यांना ईडीचे समन्स
त्यानंतर हसन मुश्रीफ यांना ईडीने समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे. ईडीच्या पथकाने सर्वांचा जबाब नोंदवून घेतला आहे. आतापर्यंत झालेल्या छापेमारीत तिन्ही वेळची एकच ईडी पथक असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, आजच्या पथकामध्ये अधिक अधिकाऱ्यांची संख्या होती.
Hasan Mushrif summoned by ED
‘सरसेनापती संताजी घोरपडे’ कारखान्याशी निगडीत कर्ज प्रकरणांची ईडीकडून हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित ईडीकडून चौकशी सुरु आहे. आतापर्यंत ईडीकडून हसन मुश्रीफ यांचे निवासस्थान, पुण्यातील ब्रिक्स कंपनीशी निगडीत तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, मुलीचे घर, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्यालय तसेच कागल तालुक्यातील सेनापती कापशी आणि गडहिंग्लज तालुक्यातील हरळी येथील जिल्हा बँकेच्या शाखेवर छापेमारी करण्यात आली आहे.
ईडीकडून 35 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल
आतापर्यंत केलेल्या छापेमारीचा कोणताही तपशील समोर आलेला नाही. हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आतापर्यंत ईडीकडून 35 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुरगूड पोलीस ठाण्यातही त्यांच्यावर 40 कोटींचा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कागलमध्ये मुश्रीफ यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी साडे नऊ तास सुरु होती. सकाळी सात वाजता ईडीचे पथक कागलमध्ये पोहोचले. छापेमारी सुरु असताना मुश्रीफ यांची दोन मुले घरी होती.
- Devendra Fadnavis | “पराभवानंतर आम्ही त्याचा पोस्टमार्टम करतो”; पोटनिवडणुकीच्या निकालावर फडणवीस पहिल्यांदाच पुण्यात
- Dhananjay Munde | “…तर तुम्ही म्हणाल ते राजकारणात करायला तयार”; धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंना ओपन चॅलेंज
- Shivsena | “बाळासाहेबांनी शिवसेना स्थापना केली, तेव्हा हे पाळण्यात लोळत होते”; ठाकरे गटाची शिंदेंवर जहरी टीका
- Nana Patole | “भाजपमध्ये काय सगळे दुधाने धुतलेले लोक आहेत का?”; नाना पटोलेंचा संतप्त सवाल
- Sadanand Kadam | रामदास कदमांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीकडून अटक
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.