Hasan Mushrif | हसन मुश्रीफांच्या धक्का; कोल्हापूर जिल्हा बँकेतील 5 कर्मचारी ईडीच्या ताब्यात

Hasan Mushrif | कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बँकेची (Kolhapur District Bank) दोन दिवसांपासून ईडीकडून (ED) झाडाझडती सुरु आहे. विशेष म्हणजे ईडीने जिल्हा बँकेतील 5 कर्मचारी ताब्यात घेतले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे. ईडीकडून काल हसन मुश्रीफ यांच्या बँक खात्याशी संबंधित चौकशी करण्यात आली होती.

ईडीकडून जिल्हा बँकेत 2 वेळा धाड टाकण्यात आली आहे. आजही ईडीने बँक कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केल्यानंतर जिल्हा बँकेच्या 5 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. माने यांच्यासह 5 अधिकाऱ्यांना ईडीने ताब्यात घेतले आहे.

बँकेच्या कारभाराबद्दल ईडीकडून तब्बल 30 तासांच्या चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. ईडी अधिकाऱ्यांच्या या कारवाईवर एका कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“आम्ही सांगितलं उद्या सकाळी नऊ वाजता तुमच्या चौकशीसाठी कर्मचारी उपस्थित राहतील. मानवतावादी दृष्टीकोनातून तुम्ही या कर्मचाऱ्यांना घरी जायला, विश्राम करायला परवानगी द्या. हे कर्मचारी उद्या चौकशीसाठी हजर राहतील”, अशी प्रतिक्रिया संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने दिली आहे.

दरम्यान, ईडीच्या या चौकशीनंतर हसन मुश्रीफ यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. चौकशीसाठी पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले असले तरी आमदार आणि कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेले हसन मुश्रीफ यांनी बँकेत कोणताही घोटाळा नाही मात्र इडीची चौकशी का? असा सवाल उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या