हसन मुश्रीफ भाजपाला पुरून उरतील, सतेज पाटलांचा दावा

मुंबई : भाजपचे फायर ब्रँड नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप लावले आहेत. मुश्रीफ यांनी केलेल्या १२७ कोटींच्या घोटाळ्यांचे तब्बल २७०० पानी पुरावेच आपण आयकर विभागाकडे सादर केल्याचं किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं होत. तसेच , फक्त हसन मुश्रीफच नाही, तर त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या नावे हे पुरावे असल्याचं ते म्हणाले होते.

यानंतर आता या सगळ्या पार्शभूमीवर २७०० पानी पुरावे घेऊन ईडीच्या कार्यालयात पोहोचले आहे. सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखानामध्ये कोट्यवधी रुपयांची बेनामी शेअर कॅपिटल भ्रष्टाचार झालेचे पुरावे घेऊन माजी खासदार किरीट सोमय्या ठरल्याप्रमाणे आज दुपारी ईडीच्या कार्यालयात पोहोचले. ईडीमधील ४ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर बैठक झाली. कागदोपत्री पुरावे दिले आहेत, अशी माहिती सोमय्यांनी दिली आहे.

यावरून कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. हसन मुश्रीफ यांच्यासारख्या सामान्य जनतेच्या हृदयात स्थान असणाऱ्या नेत्याला विनाकारण अडचणीत टाकण्याचा खटाटोप भाजपकडून सुरू आहे. पण आजपर्यंत अनेक संकटे परतवून लावणारे मुश्रीफ हे या संकटावर तितक्याच ताकदीने मात करतील व भाजपला पुरून उरतील. आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे सतेज पाटील म्हणाले. ते आज कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा