“पंतप्रधानपद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना?”

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. यावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टोला लगावला आहे.

“आजच्या वैयक्तिक आणि बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधान पद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना?, झाला असेल तर आत्ताच सांगा नंतर कटकट नको,” असं ट्विट करत संदीप देशपांडे यांनी खोचक टीका केली आहे.

या भेटीवरून विरोधी पक्षातील निशाणा साधला आहे. “पंतप्रधान मोदींना भेटण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन बोलवायला हवं होतं. त्यामध्ये चर्चा करायला हवी होती. चर्चा घडवून आणायला पाहिजे होती. मग त्यांना तुम्ही कधीही भेटा. आता हे भेटून त्यांना काय सांगणार?”, असं भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

“पंतप्रधानांसोबतच्या भेटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला नेलं असतं तर आनंदच झाला असता,” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा