Dattu More | मुंबई : सर्वांच्या घराघरात पोहचलेला आणि खळखळून हसवणारा टिव्ही शो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasya Jatra ) हा आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधील अनेक कलाकार आपल्या डायलॉग आणि अभिनयामुळे प्रत्येक्षकांच्या मनात घर करून आहेत. तर या शोमधील हास्यवीर म्हणून नावारूपाला आलेला आणि प्रेक्षकांना खळखळवून हसवणार दत्तू मोरे (Dattu More) नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. त्याचे प्री वेडिंग फोटोशूटमधील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
दत्तू मोरे अडकला विवाहबंधनात
दत्तू मोरे (Dattu More) याने आज ( 23 मे) स्वाती घुनागेशी (Swati Ghunage) लग्नगाठ बांधली असल्याची माहिती मिळत आहे. तर दत्तूने कोणालाही न कळवता गुपचूप लग्न उरकलं आहे. ‘फ्रेम फायर स्टुडिओ’ या इन्स्टाग्राम पेजवरुन दत्तूचे काही फोटो शेअर करण्यात आल्यानंतर त्याने लग्नगाठ बांधली असल्याचं समजलं आहे.
Dattu More married with Swati Ghunage
दरम्यान, दत्तूने (Dattu More) पत्नीसह प्री वेडिंग फोटोशूट देखील केलं आहे. फोटोमध्ये त्याने आपल्या पत्नीसोबत वेगवेगळ्या पोज देत फोटो काढले आहेत. तसचं या फोटोंना “जस्ट मॅरीड” असं कॅप्शन देखील देण्यात आलं आहे. त्याच्या या फोटोवर कलाकार व चाहत्यांकडून भरपूर कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर प्री वेडिंगचे फोटो देखील चांगलेचं व्हायरल होत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- Ashok Chavan | अशोक चव्हाणांवर घराणेशाहीचा आरोप; मुलगी श्रीजयाचे लावले भावी आमदार म्हणून पोस्टर
- Bacchu Kadu | जेवणाचं आमंत्रण हे जेवण केल्याशिवाय खरं नसतं; मंत्रिमंडळ विस्तारावरून बच्चू कडूंची टीका
- CSK Vs GT Qualifier 1 | पहिल्या क्वालिफायरमध्ये ‘या’ पाच खेळाडूंच्या कामगिरीवर असणार सर्वांचं लक्ष
- Nitesh Rane | …तर आम्हाला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार नाही : नितेश राणे
- Nitesh Rane | “त्र्यंबकेश्वरमध्ये धूप दाखवण्याची परंपरा…”; नितेश राणेंचा खुलासा
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3IxhShF