InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी आणि धैर्यशील माने यांच्यात ‘काटे की टक्कर’

हातकणंगले मतदार संघात दोन्ही नेत्यांमध्ये काटे की टक्कर असणार आहे. सकाळी 9.30 वाजता पहिल्या फेरीअखेर शिवसेनेचे धैर्यशील माने आघाडीवर माने यांना 35058 मते तर खासदार राजू शेट्टी यांना 35004 मते मिळाली आहेत.राजू शेट्टी यांचा मतदारसंघ आहे. देशपातळीवरील शेतकरी नेता म्हणून त्यांची ओळख आहे. या मतदारसंघात शेतक-यांचा त्यांना भक्कम पाठिंबा आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला आहे. तर शिवसेनेने धैर्यशील माने यांना मैदानात उतरवलं आहे.

माने यांच्यासाठी युतीच्या आमदारांवर त्यांचा विजय अवलंबून आहे. वंचित आघाडीने अस्लम सय्यद यांना उमेदवारी दिली आहे. हातकणंगलेतून स्वाभीमानीचे राजू शेट्टी हे पिछाडीवर आहेत. त्यामुळे सुरुवातीलाच हा मोठा धक्का मानला जातोय. इथे सेनेचे धैर्यशिल माने आघाडीवर आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.