Haunted Place In India | भारतातील ‘ही’ ठिकाणं आहेत सर्वात भीतीदायक, जाणून घ्या

Haunted Place In India | टीम महाराष्ट्र देशा: भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतामध्ये प्रत्येक राज्याची एक वेगळी संस्कृती आणि परंपरा आहे. भारत आपल्या संस्कृतीसाठी आणि परंपरेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. भारतामध्ये अनेक गोष्टी बघण्यासारख्या आहे. त्यामुळे जगभरातील पर्यटक भारताला भेट देतात. पण तुम्हाला माहित आहे का? भारतामध्ये काही ठिकाणी अशी आहेत, ज्यांचा समावेश भीतीदायक ठिकाणांमध्ये (Haunted Place) होतो. या ठिकाणी लोक रात्री जायला तर घाबरतातच पण दिवसादेखील या ठिकाणी कुणी जात नाही. तुम्हाला या ठिकाणांना भेट द्यायची असेल आणि काही वेगळा अनुभव घ्यायचा असेल, तर तुम्ही पुढील ठिकाणांना भेट देऊ शकतात.

भानगड किल्ला, राजस्थान

राजस्थान मधील भानगड किल्ला हे भारतातील सर्वात भीतीदायक ठिकाण आहे. भानगड शहरामध्ये स्थित असलेल्या या किल्ल्याबद्दल अनेक समजुती आहेत. प्राचीन काळी या किल्ल्यावर एक मांत्रिक होतात त्याने या किल्ल्याला शाप दिला होता. तेव्हापासून हा किल्ला भीतीदायक झाला आहे, असे म्हटले जाते. भानगड किल्ल्यावर सूर्यास्ताच्या वेळी कोणत्याही पर्यटकाला जाण्याची परवानगी नसते.

मुकेश मिल्स, मुंबई

मुंबईतील कुलाबाच्या समुद्राजवळ मुकेश मिल्स स्थित आहे. या ठिकाणाच्या अनेक भीतीदायक कथा प्रसिद्ध आहे. या ठिकाणी अनेक चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आलेले आहे. मात्र, हे ठिकाण भुतांच्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना अभिनेत्री बिपाशा बासूसह अनेक कलाकारांना या ठिकाणी विचित्र गोष्टी जाणवल्या आहेत.

नॅशनल लायब्ररी, कोलकाता

कोलकत्याची नॅशनल लायब्ररी ही दुर्मिळ पुस्तकांसाठी प्रसिद्ध आहे. पण या ठिकाणाच्या देखील काही भीतीदायक कथा प्रसिद्ध आहे. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी हे ग्रंथालय भारताच्या गव्हर्नर जनरलचे अधिकृत निवासस्थान होते. इथे येणार्‍या लोकांचा असा विश्वास आहे की या ठिकाणी कोणतीतरी अदृश्य शक्ती आहे. या ठिकाणी विचित्र आवाज ऐकू येत असल्याचा दावाही अनेक जण करतात. त्यामुळे या ठिकाणी रात्री जाण्यास सक्त बंदी आहे.

महत्वाच्या बातम्या