‘त्याच्या उत्पन्नातून एसटी महामंडळ चालु शकते एवढं त्याने कमावलंय’, राणेंचा पुन्हा एकदा वार

मुंबई : आज अहमदनगर येथे एका एसटी कर्मचाऱ्याने चक्क एसटी बसच्या मागील बाजूस असलेल्या लोखंडी शिडीला गळफास लावून आत्महत्या केली. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील दिलीप काकडे असे या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेवरुन भाजपचे नेते आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणेंनी पुन्हा एकदा नाव न घेता परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर घणाघाती टीका केली.

एसटी कर्मचाऱ्यांची वाईट अवस्था आहे ते आत्महत्या करत आहेत. पगार नाही, खरं तर त्याने कमावलेल्या पैश्याने एसटी चालू शकते, असं सांगत नारायण राणेंनी अनिल परबांवर हल्ला चढवलाय. ‘एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत, त्यांना कित्येक महिने पगार नाही, खरं तर याने एवढं कमावलंय, की याच्या उत्पन्नातून एसटी चालू शकते’, असा टोला नाव न घेता नारायण राणेंनी अनिल परबांना लगावला आहे.

सिंधुदुर्गात नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. पगार किती आहेत हे माहिती नाही, ही अवस्था एसटीची आहे. एसटी बसेसची अवस्था तर अशी झाली आहे की खरंतर त्यांना रस्त्यावर आणण्याची परवानगी नसली पाहिजे. खरंतर त्याच्या उत्पन्नातून एसटी चालवू शकतो एवढं त्याने कमवलं आहे. सगळ्यांचे पैसे तो गोळा करतो, तो शिवसेनेचा कलेक्टर आहे, ही उद्याची हेडलाईन आहे, असं म्हणत नारायण राणेंनी नाव न घेता अनिल परबांवर घणाघाती टीका केली.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा