‘तो’ 500 कोटींचा घोटाळा सोमय्यांनी उघड करावा; संजय राऊतांच्या पत्राने राज्यात खळबळ

मुंबई : सध्या राज्यातील महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांविरोधात ईडीची कारवाई सुरु आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांची चौकशी सध्या ईडी, आयकर विभाग किंवा सीबीआय करत आहे. तसेच भाजपा नेते किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासून महाविकासाआघाडीतील नेत्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करत आहे.

यावरूनच सध्या महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु आहे. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांनाच पत्र लिहून दणका दिला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली 500 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा झाल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.परिणामी राज्याच्या राजकारणात सध्या राऊतांच्या पत्राची जोरदार चर्चा होताना दिसतेय.

संजय राऊत पात्रात म्हणाले कि, आता मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की नुकतंच असं एक भ्रष्ट्राचाराचं प्रकरण माझ्या निदर्शनास आलं आहे. हे प्रकरण गंभीर आहे. त्यामध्ये तुम्ही लक्ष घालावं ही विनंती मी तुम्हाला करतो आहे. मी मध्यंतरी पिंपरी चिंचवड या ठिकाणी गेलो होतो. त्यावेळी श्रीमती सुलभा उबाळे आणि इतर काही सदस्यांनी मला काही कागदपत्रं दिली आहेत.

त्यावरून असं दिसतं आहे की स्मार्ट सिटी प्रकल्पात 500 कोटींचा घोटाळा झाला आहे. आपण हा घोटाळा उघड करावा ही विनंती मी आपणाला पत्राद्वारे करतो आहे. परिणामी राज्यभरातील विविध घोटाळे बाहेर काढणारे सोमय्या आता आपल्याचं पक्षाची सत्ता असणाऱ्या महापालिकेच्या कारभारात हात घालणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा