अत्याचार झाला त्याच वेळी गुन्हा दाखल करायचा होता, 2006 पासून 2020 पर्यंत का शांत बसला?

राज्याच्या राजकारणात सद्या एक चर्चेचा विषय समोर आलाय. राजकीय वर्तुळात याबाबत चर्चेला उधाण आलय. राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याची बातमी समोर आली. २००६ सालापासून धनंजय मुंडे तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते अशी तक्रार ओशिवरा पोलिस ठाण्य़ात रेणू शर्मा या महिलेने केली होती.

यानंतर मनसे नेत्या रूपाली पाटील यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.ज्या वेळी अत्याचार झाला त्याच वेळी गुन्हा दाखल करायचा होता. 2006 पासून 2020 पर्यंत का शांत बसला?, बलात्कार हा त्या महिलच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने होत असतो. संमतीने ठेवलेले संबंध बलात्कार हा बलात्कार नसतो असं रूपाली पाटील यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.

राजकारणांनो बलात्कार हे तुमच्या राजकारण खेळी बनवून नका आणि बायांनो तुमच्या संमतीचे शाररिक संबंध हे राजकारणात कोणाला वापरून देऊ नका. तुमच्या मुळे आमच्या खरोखर पीडित बलात्कार झालेल्या अन्याय झालेल्या भगिनींला न्याय मिळत नाही. याची एक महिला म्हणून लाज बाळगा, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.