देशसेवा करण्यासाठी तुरुंगातही जाईल : समीर वानखेडे

मुंबई : सध्या राज्यात मुंबई ड्रग्सप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आता एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना जाहीर कार्यक्रमात आव्हान दिले आहे. मावळमध्ये काल राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. त्यावेळी बोलताना वर्षभरात समीर वानखेडेला तुरुंगात पाठवणार, तुझी नोकरी जाणार, तुझा तुरुंगवास निश्चित आहे, असे आव्हान मलिक यांनी जाहीर कार्यक्रमात दिले.

राज्याची जनता हे सर्व पहात आहे, तुझी बोगसगिरी जनतेसमोर आणणार त्याच्या घरातले सगळे बोगस आहेत. माझ्या जावयाला तुरुंगात टाकले आणि आता मला फोन करतो, कोणत्या बापाच्या सांगण्यावरून हे करतोय? तुझा बाप कोण याचं उत्तर दे ना. तुझ्या बापाला मी घाबरत नाही. तुला तुरुंगात टाकल्या शिवाय मी गप्प बसणार नाही, असा हल्लाबोल नवाब मलिक यांनी केला आहे.

मालिकांच्या या आरोपानंतर समीर वानखेडे यांनी थेट पत्रकार परिषद घेत त्यांना आव्हान दिले आहे. मालिकांच्या खोटारडेपणाचा बुरखाही फाडला. आमच्या कार्यालयीन कामकाजांवरुन वैयक्तिक पातळीवर खालच्या पातळीत आणि घाणेरडे आरोप केले. मलिकांनी आपल्या मृत आईवर, निवृत्त वडिलांवर आणि बहिणीवर चुकीचे आणि गंभीर आरोप केले. त्यांचं मी खंडन करतो.

तसेच त्यांनी बहिणीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जाऊन जासूसी केली, असं देखील वानखेडे म्हणाले. पुढे मंत्री मलिक यांना माझ्या शुभेच्छा आहेत, मी छोटासा सरकारी नोकर आहे, ते मोठे मंत्री आहेत. जर देशाची सेवा करण्यासाठी, प्रामाणिकपणे काम करण्यासाठी, ड्रग्जविरोधी काम करण्यासाठी ते मला तुरुंगात टाकणार असतील, तर मी त्याचे स्वागत करतो, असंही समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा