‘२०२४ नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…’; भाजप नेत्याची शरद पवारांवर खोचक टीका

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. या बैठकीत भविष्यात भाजपविरोधात स्थानिक पक्षांची आघाडी एकत्र करुन पर्याय उपलब्ध करण्याबाबत चर्चा झाल्याचं कळालं आहे. या बैठकीनंतर भाजपने शरद पवारांवर टीका केली आहे.

भाजपचे अतुल भातखळकर यांनी खोचक ट्विट करून शरद पवारांवर  निशाणा साधला आहे. २०२४ नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…, असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे. भातखळकर यांनी या ट्विटमध्ये पवारांचं नाव घेतलं नाही.

प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीवर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रीया दिली होती. “कोणी कितीही रणनिती आखू दे, आजही मोदी आहेत आणि २०२४ ला देखील मोदींच्याच नेतृत्वाखाली भाजपची सत्ता असेल,” असं फडणवीस म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा