“तो आता चांगला खेळेल”, नेतृत्व सोडल्यानंतर विराटच्या कामगिरीवर इरफान पठाणची भविष्यवाणी

मुंबई : आयपीएलच्या १५ व्या हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावेळी आरसीबी संघ काही मोठ्या बदलांसह दिसणार आहे. संघात सर्वात मोठा बदल विराट कोहलीच्या रूपाने झाला आहे. यावेळी त्याच्या जागी फाफ डू प्लेसिस संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. गेल्या वर्षी विराटने शेवटच्या वेळी कर्णधार म्हणून आरसीबीचे नेतृत्व केले.

आता इरफान पठाणने विराटच्या नेतृत्वावर वक्तव्य केले आहे.विराट कोहली गेल्या अनेक महिन्यांपासून सतत खराब कामगिरीचा सामना करत आहे. पण, इरफान पठाणला खात्री आहे की तो यावेळी आयपीएलमध्ये आणखी चांगली कामगिरी करेल. “तुम्ही किमान १४ सामने खेळता आणि ते कोणत्याही क्रिकेटरसाठी पुरेसे असते.

पण, कोहलीसारख्या खेळाडूसाठी जो जबरदस्त आहे आणि आधुनिक युगाचा एक दिग्गज आहे. तो प्रत्येक सामन्यात चमकदार कामगिरी करेल. कर्णधारपदाप्रमाणे विराटवर कोणतेही दडपण नाही, तुम्ही कर्णधार असता तेव्हा तुम्हाला निकाल दिसतो. जसे चला इतर संघांची रणनीती आणि प्लेइंग इलेव्हन पाहू पण, यावेळी त्याच्याकडे तशी जबाबदारी नाही. मला वाटतं त्याला ते आवडेल.”

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा