Health Care | थकवा जाणवल्यास झटपट एनर्जी मिळवण्यासाठी खा ‘या’ गोष्टी

टीम महाराष्ट्र देशा: आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपल्या आरोग्याकडे (Health) दुर्लक्ष करतो. त्यामुळे शरीराला पुरेशी ऊर्जा (Energy) मिळत नाही. पण शरीरामध्ये मुबलक प्रमाणात ऊर्जा असली तरच आपण शरीर आणि मनाने सर्व कामे करू शकतो. कारण शरीरातील ऊर्जेची पातळी कमी झाली तर आपल्याला थकवा जाणवायला लागतो. आणि आपण कामाकडे दुर्लक्ष करायला लागतो. अशावेळी शरीरातील एनर्जी वाढवण्यासाठी काय करावे हे कळत नाही. त्यामुळेच आज आम्ही या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत. ज्या खाल्ल्याने तुम्हाला त्वरित ऊर्जा मिळेल. त्या गोष्टींचे सेवन केल्याने तुमच्या शरीरात आलेला अशक्तपणा आणि थकवा दूर होऊन तुम्ही एनर्जीने पुन्हा काम करू सुरू कराल.

लिंबू पाणी

जर तुम्हाला अचानक थकवा किंवा चक्कर येत असेल. तर तुम्ही एक ग्लास लिंबू पाणी पिऊ शकतात. या पाण्यातून आणखी एनर्जी मिळवण्यासाठी तुम्ही त्यामध्ये चिमूटभर मीठ किंवा साखरही टाकू शकतात. यामुळे तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाईटचे संतुलन राखण्यास मदत होते. लिंबू पाण्याचे सेवन केल्याने थकवा दूर होऊन तुमचा दिवस आनंदात आणि उत्साहात जाऊ शकतो.

कॉफी किंवा हर्बल चहा

शरीरात अशक्तपणा किंवा थकवा जाणवायला लागल्यास, तुम्ही हर्बल चहा किंवा कॉफीचे सेवन करू शकता. कॉफीमध्ये आढळणारे कॉफीन आपल्या शरीराला एनर्जी प्रदान करण्यास मदत करतात. त्यामुळे जर तुम्हाला त्वरित एनर्जी हवी असेल तर तुम्ही हर्बल चहा किंवा कॉफीची सेवन करू शकता.

केळी

झटपट ऊर्जा मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात केळीच्या समावेश केला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही ऑफिस टिफिन बॉक्समध्ये किंवा मुलांच्या शाळेतील टिफिन बॉक्समध्ये देखील जेवणासोबत केळी देऊ शकता. कारण जेव्हा केव्हा तुम्हाला अशक्तपणा किंवा थकवा जाणवेल तेव्हा तुम्ही केळीचे सेवन करून एनर्जी लेवल वाढवू शकतात. त्याचबरोबर केळीमध्ये मुबलक प्रमाणात विटामिन बी, फायबर, आणि पोटॅशियम उपलब्ध असते. त्यामुळे केळीचे नियमित सेवन केल्याने आपले आरोग्य चांगले राहते.

टीप : वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.