Health Care | रात्रभर ‘या’ गोष्टी पाण्यात भिजवून सकाळी त्याचे सेवन केल्याने मिळतात अनेक फायदे
Soaked Benefits | Health Care : शरीर निरोगी ठेवण्यासाठी पोषक आहाराचे सेवन करणे खूप महत्त्वाचे असते. व्यवस्थित आहार घेतल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत राहून, शरीर दीर्घकाळ निरोगी राहते. निरोगी राहण्यासाठी बहुतांश लोक सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कोमट पाण्याचे सेवन करतात. तर काही लोक रिकाम्या पोटी अनेक गोष्टी खातात. तुम्हाला पण निरोगी राहायचे असेल तर तुम्ही काही गोष्टी रात्री भिजवून ठेवून सकाळी त्याचे सेवन करू शकतात. या रात्री भिजवून ठेवलेल्या गोष्टींचे सकाळी सेवन केल्याने आरोग्याला दुप्पट फायदे ( Soaked Many Benefits ) मिळतात. निरोगी राहण्यासाठी पुढील गोष्टी रात्री भिजवून सकाळी त्याचे सेवन करू शकतात.
अक्रोड ( Soaked Walnuts for Health Care)
अक्रोड आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. भिजवलेल्या अक्रोडाचे सकाळी सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे ( Soaked Walnuts Benefits ) मिळतात. तुम्ही नियमित रात्री भिजवलेल्या अक्रोडाचे सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्याने स्मरणशक्ती ( Memory ) वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर याचे नियमित सेवनाने मेटाबोलिझम वाढते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात आयरन, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉलेट आढळून येते. त्यामुळे नियमित याचे सेवन करणे शरीरासाठी उपयुक्त ठरू शकते.
मनुका ( Soaked Raisin for Health Care)
मनुक्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. यामध्ये आयरन, प्रोटीन, फायबर इत्यादी घटकांचा समावेश आहे. रात्री भिजवून ठेवलेल्या मनुक्यांचे सकाळी सेवन केल्याने शरीरातील अशक्तपणा ( Weakness ) दूर होतो. त्याचबरोबर नियमित याच्या सेवनाने हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. तुम्ही रोज रात्री सहा ते सात मनुके पाण्यात भिजवून ठेवू शकतात. त्यानंतर सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी या मनुकांचे सेवन ( Soaked Raisin Benefits ) करू शकतात. नियमित याचे सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
बदाम ( Soaked Almonds for Health Care)
बदामामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. त्यामुळे बदामाला पोषक तत्त्वांचा खजिना असे देखील म्हणतात. यामध्ये प्रोटीन, आयरन, फॉस्फरस, फायबर इत्यादी गुणधर्म माफक प्रमाणात आढळून येतात. तुम्ही दररोज रात्री चार ते पाच बदाम ( Soaked Almonds Benefits ) भिजवून ठेवू शकतात. त्यानंतर सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही त्याचे सेवन करू शकतात. नियमित भिजवलेल्या बदामाचे रिकाम्या पोटी सेवन केल्याने वजन ( weight ) कमी होण्यास मदत होते.
अंजीर ( Soaked Fig for Health Care)
अंजीरामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. अंजिराचे सेवन ( Soaked Fig Benefits ) केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि शरीर निरोगी राहण्यास मदत होते. अंजीर रात्री पाण्यात भिजवून ठेवल्याने मऊ होते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करणे सोपे जाते. नियमित सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेल्या अंजिराचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती ( Immunity ) मजबूत होते आणि शरीरातील अशक्तपणा ( Weakness ) दूर होतो.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Abhijeet Bichukale | कसबा निवडणुकीत अभिजीत बिचुकलेंची एन्ट्री; काँग्रेस, भाजपला फोडणार घाम
- Job Opportunity | CDAC मध्ये नोकरीची संधी! ‘या’ पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू
- Lokshahi – लोकशाही मुल्य अबाधित ठेवण्याची गरज
- Coconut Milk | केसांची काळजी घेण्यासाठी कोकोनट मिल्कचा ‘या’ पद्धतीने करा वापर
- Nana Patole | “कुटुंबाचा वाद पक्षावर येऊ नये”; सत्यजीत तांबे प्रकरणावर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य
Comments are closed.