Health Care Tips | आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या अश्वगंधा बद्दल, जाणून घ्या

टीम महाराष्ट्र देशा: आयुर्वेदामध्ये अश्वगंधा ही खूप महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. आरोग्य तज्ञ आपल्याला अनेक वेळा निरोगी शरीरासाठी अश्वगंधाचे सेवन करायचे सल्ले देतात. त्याचबरोबर अनेक औषधांमध्ये देखील अश्वगंधा वापरली जाते. अश्वगंधा कधी आणि किती प्रमाणात खावे याचा देखील योग्य सल्ल्या घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण अश्वगंधा शरीरासाठी कितीही फायदेशीर असले तरी त्याचे किती प्रमाणात सेवन केले पाहिजे याचा योग्य सल्ला तज्ञांकडून घेणे आवश्यक आहे. या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अश्वगंधा बद्दल अधिक माहिती सांगणार आहोत.

नक्की काय आहे अश्वगंधा?

अश्वगंधा ही एक आयुर्वेदिक उपचारात वापरली जाणारी औषधी वनस्पती आहे. अश्वगंधा पावडर, कॅप्सूल इत्यादी गोष्टी बनवण्यासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो. अश्वगंधा वनस्पतीचे वैज्ञानिक नाव ‘विथानिया सेम्रिफेरा’ असून त्याला सामान्य भाषेमध्ये अश्वगंधा किंवा भारतीय हिरवी चेरी असे म्हणतात. भारतातील पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये अश्वगंधा औषधी वनस्पती आढळून येते. त्याचबरोबर चीन मधील नेपाळमध्येही अश्वगंधा वनस्पती दिसते. जगामध्ये अश्वगंधाच्या एकूण 23 प्रजाती असून त्यापैकी 2 भारतात आढळतात.

अश्वगंधा चे फायदे

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन यांच्या मते, अश्वगंधा मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहे. प्रामुख्याने यामध्ये तणाव विरोधी गुणधर्म आढळतात. त्याचबरोबर अश्वगंधा स्टॅमिना वाढवण्यास मदत करते. म्हणूनच अश्वगंधाचे सेवन शरीराला अनेक फायदे देते.

या गोष्टी देखील आहेत महत्त्वाच्या

आयुष मंत्रालय यांच्यामध्ये, एखाद्या आयुर्वेदिक औषधाची चाचणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ते औषध किंवा आयुर्वेदिक वनस्पती पूर्णपणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे हे सांगता येत नाही. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या दिनचर्या सोबत खाण्याच्या सवयी व्यवस्थित ठेवल्या पाहिजे. कारण मानवी शरीर हे एक यंत्र असून त्याला पोषक तत्वे देणे आपले काम आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.