Health Care Tips | बनाना शेक पिल्यावर होऊ शकते ‘हे’ शारीरिक नुकसान

टीम महाराष्ट्र देशा: केळी (Banana) आणि दूध (Milk) दोन्हीही आरोग्य (Health) साठी खूप फायदेशीर असते. चांगल्या आरोग्यासाठी डॉक्टर देखील नेहमी आपल्याला केळी आणि दूध यांचे सेवन करण्याचा सल्ला देतात. जोपर्यंत या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत तोपर्यंत या गोष्टी आपल्या आरोग्याला फायदा देतात. पण जेव्हा या दोन्ही गोष्टी बनाना शेक (Banana Shake) च्या रुपामध्ये एकत्र येतात तेव्हा त्याचे आपल्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. त्याबद्दलच आम्ही या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

बनाना शेक पिल्यावर आरोग्य (Health)वर पुढील परिणाम होऊ शकतात

वजन वाढू शकते 

बनाना शेकमध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात त्यामुळे बनाना शेकचे सेवन केल्यामुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होऊ शकते. केळी आणि दूध या दोन्ही गोष्टींमध्ये मुबलक प्रमाणात कॅलरीज उपलब्ध असतात. पण जेव्हा आपण या दोन्ही गोष्टींचे एकत्र सेवन करतो तेव्हा त्याचे प्रमाण वाढून शरीरामध्ये लठ्ठपणाची समस्या निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी बनाना शेक टाळणे  गरजेचे आहे.

पचनक्रियेत समस्या निर्माण होऊ शकते 

वरती नमूद केल्याप्रमाणे, बनाना शेकमध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज आढळतात. त्यामुळे बनाना शेकचे सेवन केल्यानंतर पचनसंस्थेला खूप काम करावे लागते. त्यामुळे पचनक्रिया विस्कळीत होऊन शरीरामध्ये गॅस, ॲसिडिटी इत्यादी सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

कोलेस्ट्रॉल वाढू शकते 

बनाना शेकचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते. कारण त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये फॅट आढळते. परिणामी शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा किंवा हृदयरोग निर्माण होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

सर्दी होऊ शकते

बनाना शेकचे नियमित सेवन केल्याने सर्दी, खोकला, छातीमध्ये दुखणे इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात. कारण केळीमध्ये थंड गुणधर्म आढळतात. त्यामुळे बनाना शेक पिल्याने सर्दीची समस्या निर्माण होऊ शकतो.

टीप : वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.