Health Care Tips | ‘या’ नैसर्गिक औषधी वनस्पती ठेवतील तुम्हाला मानसिक तणावापासून दूर

टीम महाराष्ट्र देशा: वाढत्या तंत्रज्ञानाच्या जगात तणाव आणि नैराश्य हे मानसिक आजार दिवसेंदिवस खूप वाढत चालले आहेत. जवळपास 60 % लोक या आजारांना झुंज देत आहे. नियमित डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधे घेतल्याने किंवा जीवनशैलीत काही सकारात्मक बदल केल्याने ही परिस्थिती टाळता येऊ शकते. पण अनेकांना औषध घेणे टाळायचे असते त्यामुळे त्यांची ही परिस्थिती अधिक विकट होत जाते. पण या आजारावर अशी काही आयुर्वेदिक औषधे आहे जी घेतल्यावर तुमची मानसिक स्थिती बदलू शकते. ध्यान आणि योगाद्वारे सुद्धा तुम्ही तुमचे मानसिक आरोग्य निरोगी ठेवू शकतात. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये अनेक औषधी वनस्पती आहे ज्या नैराश्य आणि तणाव दूर करतात.

मानसिक तणावापासून दूर ठेवणारे औषधी वनस्पती

मका

मका ही एक औषधी वनस्पती आहे ज्यामध्ये पोषक तत्वे आढळतात. ही पोषक तत्वे चिंता कमी करण्यास मदत करतात. मका मध्ये आढळणारे हाय फायटोन्यूट्रिएंट घटक शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. या सर्व घटकांमुळे झोपेची समस्या दूर होऊन हार्मोन्स नियंत्रणात येऊ लागतात.

ब्राम्ही

ब्राम्ही हा आयुर्वेदामधील खूप महत्त्वाचा घटक आहे. ब्राम्ही एक महत्त्वाचे औषधी वनस्पती आहे. ब्राम्ही मनाला निरोगी आणि मजबूत बनवण्यासाठी मदत करते. ब्राम्हीचे सेवन केल्याने स्मरणशक्ती सुधारू शकते. त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती सुद्धा मजबूत होऊ शकते. ब्राम्हीचे सेवन केल्याने मानसिक आरोग्य सुधारू शकते.

जटामासी

जटामासी तणाव आणि नैराश्य दूर करण्यासाठी एक प्रभावी औषधी वनस्पती आहे. यामुळे आपली मानसिक आरोग्य सुधारून झोप देखील सुधारू शकते. बरोबर जटामासीचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधी मध्ये केला जातो.

लिंबू

लिंबू ही एक औषधी वनस्पती आहे जिचे सेवन केल्याने आपला मूड बदलू शकतो. लिंबू मध्ये तणाव आणि चिंता दूर करण्यासाठीचे पोषक घटक आढळतात. तसेच लिंबाचे सेवन केल्याने झोप देखील सुधारू शकते.

अश्वगंधा

अश्वगंधा ही एक प्रभावी औषधी वनस्पती आहे. त्याचबरोबर अश्वगंधा अनेक आजारांसाठी रामबाण उपाय आहे. अश्वगंधाचे सेवन केल्याने हार्मोन नियंत्रणात राहून शरीर निरोगी राहते. यामुळे झोप देखील सुधारू शकते. बरोबर अश्वगंधा ही एक अशी औषधी वनस्पती आहे जी तुम्हाला तणावापासून दूर ठेवते

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.