Health Care Tips | सर्दीमुळे आहात परेशान? तर करा ‘हे’ घरगुती उपाय

टीम महाराष्ट्र देशा:  सकाळी आणि संध्याकाळी हवेतील थंडपणा आजकाल चांगलाचं जाणवत आहे. दिवाळी जशी जशी जवळ येईल तसं तसं हवेतील थंडपणा अधिकाधिक जाणवायला लागेल. ही गुलाबी थंडी आपल्याला कितीही चांगली वाटली तरी ती तिच्या सोबत अनेक आजार घेऊन येते. यामध्ये प्रामुख्याने सर्दी खोकल्याचा समावेश होतो. जर तुम्हाला सर्दीमुळे नाक बंद होण्याचा  त्रास होत असेल  तर त्यासाठी तुम्ही पुढील घरगुती उपाय करू शकता.

सर्दीमुळे नाक बंद झाल्यास खालील घरगुती उपाय करा

स्टार एनीस ऑइल

सर्दी आणि खोकल्यामुळे नाक बंद झाल्यास तुम्ही स्टार एनीस ऑइल वापरू शकतात. स्टार एनीस ऑइल हे एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती पासून तयार केलेले तेल असून ते तुम्हाला शारीरिक आणि मानसिक दोन्ही वेदनांपासून त्वरित आराम देईल. हे तेल तुम्ही नाक घसा आणि छातीला लावून सुद्धा झोपू शकता त्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल.

यूके लिप्टिस ऑइल

यूके लिप्टिस ऑइल हे एक हरबल उत्पादक आहे जे तुम्हाला कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये सहज मिळेल. सर्दी, खोकला झाला असल्यास तुम्ही हे तेल वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतात. जसे की सर्दी झाल्यास तुम्ही या तेलाचे दोन थेंब रुमालावर टाकून त्याचा वास घेऊन नंतर ते उशी जवळ ठेवून झोपू शकता. यामुळे तुम्हाला बराच आराम मिळेल. घरात वावरताना किंवा प्रवास करताना तुम्ही या तेलाचे दोन-तीन थेंब एखाद्या रुमाला मध्ये घेऊन मध्ये मध्ये त्याचा वास घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला बरे वाटेल.

लेमन ग्रास ऑइल

सर्दीमुळे श्वासनाची समस्या निर्माण झाल्यास तुम्ही लेमन ग्रास ऑइल वापरू शकतात. या तेलाच्या वासामुळे तुम्हाला फायदा होईलच पण त्याबरोबर घरातही एक छान सुगंध दरवळेल. त्याचबरोबर तुम्ही हे तेल झोपताना नाकाला लावले तर त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित झोप देखील लागेल.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.