Health Care Tips | सकाळी रिकाम्या पोटी ‘या’ गोष्टीचे सेवन केल्याने वाढू शकते मेटाबॉलिज्म

Health Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: आरोग्यासाठी (Health) मेटाबॉलिज्म (Metabolism) खूप महत्त्वाचे असते. शरीरामध्ये मेटाबॉलिज्मची गती मंदवल्यानंतर मेटाबॉलिज्म डीसऑर्डर उत्पन्न होऊ शकतात. त्याचबरोबर शरीरात मेटाबॉलिज्मची कमतरता निर्माण झाल्यास वजन वेगाने वाढू लागते. त्यामुळे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी मेटाबॉलिज्म नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये काही गोष्टींचा समावेश करू शकतात. शरीरातील मेटाबॉलिज्म नियंत्रात ठेवण्यासाठी तुम्ही आहारामध्ये पुढील गोष्टींचा समावेश करू शकतात.

अंडी

मेटाबॉलिज्म नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी अंड्याचे सेवन केले पाहिजे. अंडी हा एक प्रोटीनचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी अंड्याचे सेवन करणे शरीरासाठी देखील खूप फायदेशीर ठरू शकते.

आले

मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी तुम्ही नियमित आल्याचे सेवन करू शकतात. यासाठी तुम्हाला एक ग्लास कोमट पाण्यामध्ये आले मिसळून सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करावे लागेल. त्याचबरोबर तुम्ही आल्याचा चहामध्ये देखील वापर करू शकतात. पण सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत आल्याचे सेवन केल्याने तुम्हाला अधिक फायदे मिळतील.

ॲपल व्हिनेगर

ॲपल व्हिनेगर मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी ॲपल व्हीनेगरचे सेवन करावे लागेल. तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक ते दोन चमचे ॲपल व्हीनेगर मिसळून त्याचे सेवन करू शकतात. नियमित याचे सेवन केल्याने मेटाबॉलिज्म वाढू शकते. ॲपल व्हिनेगर नेहमी पाण्यामध्ये मिसळूनच सेवन केले पाहिजे. कारण थेट त्याचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

मोड आलेले धान्य

मोड आलेल्या धन्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन्स उपलब्ध असतात. प्रोटीन्स मेटाबॉलिज्म सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही प्रोटीन युक्त पदार्थांचे सेवन करतात तेव्हा शरीरातील मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत होते. या पदार्थांचे सेवन केल्याने वजनही नियंत्रणात राहू शकते. यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी मोड आलेले मूग, हरभरे इत्यादी गोष्टींचे सेवन करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या