आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा ; लवकरच मास्क-सॅनिटायझर किंमतींच्या नियंत्रणाबाबत आदेश काढणार

मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण आणणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून येत्या चार दिवसांत याबाबतचे आदेश जारी करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मुंबईमध्ये झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलत असताना आरोग्यमंत्री म्हणाले, मास्क आणि सॅनिटायझर सर्वसामान्यांना परवडेल, “अशा दरात उपलब्ध असतील. काहीजण अव्वाच्या सव्वा भावात मास्क विकत आहेत. मास्कच्या क्वालिटीनुसार आम्ही दर नियंत्रित करणार आहोत. त्याचप्रमाणे कोरोनाच्या चाचणीचे दरही आपण 1900 रुपयांपर्यंत खाली आणले आहेत. याचशिवाय घरी जाऊन चाचणी करण्यासाठी नागरिकांना 2400 ते 2500 रुपये मोजावे लागणार आहेत.”

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची आज इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. “खासगी डॉक्टरांना विमा संरक्षण मिळावं याबाबत मागणी केली जातेय. त्यावर राज्य सरकार विचार करेल. शिवाय आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या बैठकीवेळी राज्य सरकारकडून महाराष्ट्रात साथीच्या रोगासाठी विशेष रुग्णालय उभारण्यात यावं, अशी मागणी करण्यात आलीये. यापैकी पहिले रुग्णालय मुंबईत उभारलं जाईल,” अशी मागणीही आरोग्यमंत्र्यांनी केली.

महत्वाच्या बातम्या :-

प्रियंका आणि निक जोनसच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

स्वातंत्र्य दिनानिमित्त मोदींसाठी लाल किल्ल्यावर कोरोना प्रूफ लेयर

पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आरोग्यमंत्र्यांनी उचलले कडक पाऊल

पार्थ पवारांच्या जय श्रीराममुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वैचारिक कोंडी

मास्कचे महत्व पटवून देण्यासाठी नागपूर पोलिसांची ‘हि’ भन्नाट आयडिया

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.