Health Tips | निरोगी आणि मजबूत आतड्यांसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे समावेश

Health Tips | टीम महाराष्ट्र देशा: निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आतड्यांचे चांगले राहणे खूप महत्त्वाचे आहे. योग्य आहाराचे सेवन केल्याने आतडे निरोगी राहू शकतात. त्याचबरोबर योग्य आहाराचे सेवन केल्याने शरीरात चांगले बॅक्टेरिया तयार होतात, जे संसर्ग आणि रोगांपासून तुमचे संरक्षण करण्यास मदत करतात. शरीरातील आतडे निरोगी असल्यास रोगप्रतिकारशक्ती आणि पचनक्रिया मजबूत राहते. त्यामुळे आतडे निरोगी ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. आतड्यांची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही खाद्यपदार्थांचा समावेश करू शकतात. आतडे निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही खालील खाद्यपदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करू शकतात.

आले (Ginger-Health Tips)

आतड्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आल्याचे सेवन करणे उपयुक्त ठरू शकते. आल्यामध्ये अँटिइफ्लिमेंटरी गुणधर्म आढळून येतात, जे आतड्यांची काळजी घेण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी आल्याचे सेवन करावे लागेल. सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही आल्याच्या पाण्याचे सेवन करू शकतात.

कांदा (Onion-Health Tips)

आतडे निरोगी आणि सक्रिय ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात कांद्याचा समावेश करू शकतात. कांद्याचे नियमित सेवन केल्याने आतडे फ्री रॅडिकलच्या धोक्यापासून दूर राहू शकतात. त्याचबरोबर कांद्याचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते.

लसूण (Garlic-Health Tips)

कच्चा लसूण खाल्ल्याने आतड्यात चांगले बॅक्टेरिया तयार होऊ शकतात. लसणामध्ये सेलेनियम, विटामिन सी, विटामिन बी 6 इत्यादी गुणधर्म आढळून येतात, जे गॅस, अपचन, बद्धकोष्ठता इत्यादी पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करतात. लसणाचे नियमित सेवन केल्याने आतडे निरोगी आणि मजबूत राहू शकतात.

आतड्यांना मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही वरील खाद्यपदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करू शकतात. त्याचबरोबर बडीशेपच्या तेलाच्या मदतीने आरोग्याच्या खालील समस्या दूर होऊ शकतात.

पचनसंस्था मजबूत होते (The digestive system is strengthened-Fennel Seeds Oil)

तुम्ही जर बद्धकोष्टतेच्या समस्येपासून त्रस्त असाल तर बडीशेपचे तेल तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. बडीशेपच्या तेलामध्ये आढळणारे फायबर पोटाच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. याच्या सेवनाने अपचन, गॅस, बद्धकोष्टता यासारख्या समस्या सहज दूर होऊ शकतात.

त्वचा निरोगी राहते (Skin stays healthy-Fennel Seeds Oil)

त्वचेची काळजी घेण्यासाठी बडीशेपचे तेल उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला बडीशेपचे तेल पाण्यात टाकून त्या पाण्याने वाफ घ्यावी लागेल. या तेलामध्ये अँटी इम्प्लिमेंटरी आणि अँटीमायक्रोवेल गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेला शांत करण्यास मदत करतात. आठवड्यातून दोन वेळा या तेलाने वाफ घेतल्याने त्वचा निरोगी राहू शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या