Health Tips | ‘या’ आजारांमुळे वाढू शकते वजन, जाणून घ्या!

टीम महाराष्ट्र देशा: आजकाल वजन वाढणे ही एक अत्यंत सामान्य समस्या आहे. प्रत्येक दुसरा व्यक्ती वाढत्या वजनामुळे त्रस्त आहे. त्यामुळे लोक जिम पासून डायटिंग पर्यंत सर्व पर्याय अवलंबितात. वयानुसार वजन वाढणे हे अगदी सामान्य आहे. नाहीतर, योग्य आहार न घेतल्याने जास्तीचे वजन वाढू लागते. पण यासोबतच काही आजार असे आहेत ज्यामुळे तुमचे वजन वाढू लागते. या आजारामुळे तुम्हाला लठ्ठपणाच्या समस्येला सामोरे जाऊ लागू शकते.

टाईप 2 डायबिटीज

यूएस नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डायबिटीज अँड डायजेस्टिव्ह अँड किडनी डिसीजेस यांच्या मते, तुम्ही जर टाईप 2 डायबिटीस चे रुग्ण असाल तर तुमचे वजन वाढण्याची शक्यता आहे. 10 पैकी 8 टाईप 2 डायबिटीसच्या रुग्णांना या समस्येला सामोरे जाऊ लागू शकते. जर तुम्ही टाईप 2 डायबिटीसचे रुग्ण असाल तर तुम्हाला तुमचे वजन 7 ते 8 टक्के कमी करण्याचा सल्ला डॉक्टरांद्वारे दिला जातो.

हाय ब्लड प्रेशर

मेडिकल तज्ञांना नेहमी वाढते वजन आणि ब्लड प्रेशर हे संशोधनासाठी आवडीचे विषय आहे. वाढते वजन आणि ब्लड प्रेशर यांचा थेट संबंध आहे. त्यामुळे हाय ब्लड प्रेशर असलेल्या लोकांना नेहमी वजन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे हाय ब्लड प्रेशर असलेल्या लोकांना त्यांच्या दिनचर्येत व्यायामाचा समावेश करा असे डॉक्टरांकडून सांगितले जाते.

कॅन्सर आणि थायरॉईड

कॅन्सर आणि थायरॉईड मुळे देखील वजन वाढण्याची शक्यता असते. यामध्ये प्रामुख्याने पोस्टमेनोपॉझल, कोलन-रेक्टम, एंडोमेट्रियम, अंडाशय, स्वादुपिंड, मूत्रपिंड, पित्ताशय, गॅस्ट्रिक कार्डिया, यकृत, अन्ननलिका (एडेनोकार्सिनोमा), मेनिन्जिओमा, थायरॉईड आणि यांचा समावेश होतो.

स्लीप एपनिया

स्लीप एपनिया म्हणजेच झोपेची समस्या देखील वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. माणसाने आपल्या शरीराला आठ तास व्यवस्थित झोप नाही दिली, तर त्याला वजन वाढी सोबतच इतर अनेक समस्या नाही तोंड द्यावे लागू शकते. एका संशोधनानुसार, स्लीप एपनिया ची समस्या 40 % लठ्ठ लोकांमध्ये आढळून येते.

टीप : वरील गोष्टींसाठी डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घ्या.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.