Health Tips | ‘या’ लोकांनी नाही खायला पाहिजे दही, आरोग्याला होऊ शकते हानी

Health Tips | टीम महाराष्ट्र देशा: दही (Curd) आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण यामध्ये माफक प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम इत्यादी घटक आढळून येतात. त्याचबरोबर दही एक उत्कृष्ट प्रोबायोटीन आहे. दही आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांना प्रोत्साहन देऊन पचन संस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर दह्याचे सेवन केल्याने त्वचा आणि केस देखील निरोगी राहू शकतात. मात्र, काही लोकांना दह्याचे सेवन केल्याने हानी पोहोचू शकते. होय! पुढील लोकांनी दह्याचे सेवन करू नये.

दम्याच्या रुग्णांनी

दम्याच्या रुग्णांनी दह्याचे सेवन करणे टाळावे. दह्यामध्ये असलेल्या आंबटपणामुळे या रुग्णांना हानी पोहोचण्याची शक्यता असते. त्याचे सेवन केल्याने दम्याच्या रुग्णांच्या छातीत कफ जमा होऊ शकतो आणि श्वसनाचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही जर दम्याचे रुग्ण असाल, तर तुम्ही दह्याचे सेवन करणे टाळले पाहिजे.

संधिवाताचे रुग्ण

संधिवाताच्या रुग्णांनी दह्याचे सेवन करणे टाळले पाहिजे. कारण दही एक प्रकारचे आंबट अन्न आहे. आंबट अन्न खाल्ल्याने सांधेदुखीच्या रुग्णांना हानी पोहोचू शकते. त्याचबरोबर दह्याचे सेवन केल्याने सांधेदुखीच्या रुग्णांची वेदना आणि सूज येण्याची समस्या वाढू शकते.

ऍसिडिटी रुग्ण

कमकुवत पचन संस्था असलेल्या लोकांनी दह्याचे सेवन करणे टाळावे. तुम्हाला जर पोटात गॅस किंवा ऍसिडिटीची समस्या होत असेल, तर तुम्ही दह्याचे सेवन करणे टाळावे. या रुग्णांनी विशेषता रात्रीचे दही अजिबात खाऊ नये. ऍसिडिटीच्या रुग्णांनी दह्याचे सेवन केल्यास ऍसिडिटी आणि अपचनाची समस्या वाढू शकते.

टीप: वरील माहितीसाठी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.