InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

Health

काय निघणार तोडगा? संपकरांना भेटणार ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांसोबत झालेल्या हिंसाचारानंतर देशभरातील डॉक्टरांनी या घटनेचा निषेध केला. प. बंगालमधील डॉक्टरांसह देशभरातील डॉक्टरांनी संप पुकारला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या आवाहनानंतर देशातील ५ लाख डॉक्टरांनी संपात सहभाग घेतला आहे. दिल्लीमेडिकल असोसिएशनचे १८ हजार डॉक्टरही संपावर आहेत.  डॉक्टर ६ दिवसांपासून संपावर गेले आहेत. त्यांनतर ममता बॅनर्जी यांनी हा भाजपचा कट असल्याची प्रतिकिया दिली होती.पश्चिम बंगालच्या संपकरी डॉक्टरांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री ममता…
Read More...

सेवांना बाधा न पोहचता आंदोलन अद्यापही सुरूच

देशभरात सुरु असलेला डॉक्टरांचा संप आज सोमवारी पुन्हा सुरु राहणार आहे.इंडियन मेडिकल असोसिएशनच्या आवाहनानंतर देशातील 5 लाख डॉक्टरांनीसंपात सहभाग घेतला आहे. दिल्ली मेडिकल असोसिएशनचे 18 हजार डॉक्टरही संपावर आहेत.दिल्ली मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी अत्यावश्यक सेवांना बाधा न पोहचता संप करण्याचं आवाहन डॉक्टरांना केलं आहे.दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी या संपात सहभाग न घेतल्याने एम्सच्या रुग्णसेवेवर परिणाम होणार नाही.पश्चिम बंगालच्या संपकरी डॉक्टरांच्या आंदोलनावर तोडगा…
Read More...

डॉक्टरांचे कामबंद आंदोलन पसरले देशभर

कोलकाता शहरातील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील दोन डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ मुंबईसह देशभरातील निवासी डॉक्टर शुक्रवारी (14 जून) संपावर होते.डॉक्टरांच्या प्रश्नांबाबत पश्चिम बंगाल सरकार पुरेसे गंभीर नसल्याचा आरोप डॉक्टरांच्या संघटनेने केला आहे. सरकारच्या निषेधार्थ तब्बल 700 डॉक्टरांनी आपले राजीनामे दिले आहेत. या आंदोलनामुळे मुंबईसह महाराष्ट्र, तसेच दिल्ली व अनेक राज्यांतील आरोग्यसेवेवर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे सरकारने डॉक्टरांशी चर्चा करून लवकर…
Read More...

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड रुग्णालयात सुविधांपासून रूग्ण वंचित

रुग्णलायातील कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पिपंरी चिंचवड येथील देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड रुग्णालयामध्ये लहान मुलांना इंजेक्शन देताना चक्क जमिनीवर झोपून दिलं जात आहे.पिंपरी चिंचवडच्या देहरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड रुग्णालयामध्ये लहान मुलांना लसीकरण दिले जात आहे मात्र ते बेड वर न देता या चिमुरड्यांना चक्क जमिनीवर फक्त एक चादर टाकून इंजेक्शन्स दिले जात आहे. हा संपूर्ण प्रकार विडिओ कॅमेरा मध्ये कैद झाल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली.सरकारी रुग्णालयातील डॉक्टर आणि…
Read More...

स्वाइन फ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत घट

राज्यामध्ये स्वाइन फ्लूच्या प्रार्दुभावामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात मे महिन्यापासून घट झाली आहे. गेल्या सुमारे 25 दिवसांमध्ये एकही रुग्णाचा मृत्यू झाला नसून रुग्णसंख्येत देखील घट झाली आहे. राज्यात केवळ दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.गेल्या वर्षी थंडीचे प्रमाण जास्त असल्याने राज्यात फेब्रुवारी- मार्च महिन्यापर्यंत थंडीचे प्रमाण काही भागात जाणवले. हे हवामान स्वाइन फ्लूच्या…
Read More...

तंबाखूमुक्त शाळा अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे राजकुमार बडोले यांचे आवाहन

तंबाखू आणि तंबाखूच्या धुरामध्ये निकोटीन सारखी सात हजारहून अधिक विषारी रसायने असतात. त्यामुळे व्यसनाधीन माणसाला कॅन्सरसारखे दुर्धर आजार होतात. व्यसनाधीन व्यक्तीच नाही, तर त्यांची कुटुंबेही तंबाखूच्या व्यसनाचा बळी ठरत आहेत. राज्य शासन आणि सलाम मुंबई फाउंडेशन संयुक्तरित्या सुदृढ महाराष्ट्र बनविण्याचे कार्य करीत आहे. मुंबईसह राज्यातील शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठीच्या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि देशाची भावी पिढी निरोगी राहील याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सामाजिक न्याय व…
Read More...

राज्यात मान्सूनचे आगमन होण्यास विलंब

राज्यात यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मान्सूनचे आगमन अंदमान भागात झाले असले तरी त्याची पुढची वाटचाल हळू राहणार आहे. यामुळे केरळमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तरी मान्सूनच्या आगमनाची शक्यता कमी आहे.राज्यात किमान 8 जूनपर्यंत तरी मान्सून-पूर्वीच्या पावसाची शक्यता नाही. 31 मे पर्यंत तापमानात बदल अपेक्षित नसल्यामुळे उन्हाचा चटका कायम राहील, परंतु 1 जूनपासून पूर्व-विदर्भ वगळता इतर भागातील कमाल तापमान कमी होण्यास सुरुवात होईल. यंदा…
Read More...

महिलांची अस्मिता जपण्यासाठीची ताकद म्हणजेच ‘अस्मिता प्लस’ योजना – पंकजा मुंडे

राज्यातील महिलांची अस्मिता जपण्यासाठीची ताकद म्हणजेच अस्मिता प्लस योजना असल्याचे महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे सांगितले. जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या महिला या सन्मानाच्या, शिक्षणाच्या, कुपोषणाच्या आणि स्वच्छतेच्या दुष्काळातून बाहेर पडत आहेत. महिलांच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ योग्य दिशेने कार्यरत आहे.महाराष्ट्र राज्य ग्रामीण…
Read More...

दूध संघांनी दूध पिशव्यांच्या संकलन, पुनर्प्रक्रिया व्यवस्थेचा आराखडा १५ दिवसांत सादर करण्याचे…

पंधरा दिवसांच्या मुदतीमध्ये दूध संघांनी पिशवीबंद दूध पिशव्यांची संकलन, पुनर्खरेदी (बायबॅक) किंवा पुनर्प्रक्रिया (रिसायकलिंग) व्यवस्थेचा आराखडा सादर करावा. मुदतीत योग्य ती कार्यवाही करण्यास असमर्थ ठरणाऱ्या पॅकिंग दूध प्रकल्पांवर प्लास्टिक बंदी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज येथे दिला.प्लास्टिकबंदीबाबत उच्चाधिकार समितीची बैठक आज श्री. कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्यावेळी कामगारमंत्री श्री. संभाजी पाटील निलंगेकर, महाराष्ट्र…
Read More...

राज्यात सहा हजार टँकर्सद्वारे साडेपंधरा हजार गावांना पाणी

राज्यातील जलाशयांमध्ये केवळ 13 टक्के साठा शिल्लक राहिल्यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत असून 4920 गावे व 10506 वाड्यांमध्ये 6209 टँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. राज्यात शेळ्या-मेंढ्यांसह मोठ्या व लहान जनावरांसाठी दीड हजार चारा छावण्या उभारण्यात आल्या आहेत. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना साडेचार हजार कोटींच्या मदतीचे वाटप करण्यासह विद्युत शुल्कात सवलत, शैक्षणिक शुल्क माफी,…
Read More...