InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

Health

पोटातील चरबी कमी करण्यासाठी ५ घरगुती उपाय

कमी प्रमाणात खा : जर तुम्हाला एकादाच भरपूर जेवण्याची सवय असेल तर ही सवय सोडा. आहार 3 ते 4 भागांमध्ये वाटून घ्या. प्रत्येकवेळी पोटभर न जेवता थोडं-थोडं खा.गरम पाणी : पहाटे रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे अतिशय फायदेशीर आहे. यामुळे कॅलरीज कमी होतात. गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यायल्याने ते आरोग्यासाठी आणखी लाभदायक ठरतं.मॉर्निंग वॉक : पहाटे पायी चालणे, जॉगिंग करणे किंवा व्यायाम करा यामुळे पोटातील चरबी कमी होण्यासाठी मदत होईल.योग : योगा केल्याने शारीरिकच नव्हे तर मानसिक तक्रारीदेखील दूर होतात.…
Read More...

मुख्‍यमंत्री सहायता निधीतून ‘आरोग्‍याचा चातुर्मास’ या उपक्रमासाठी मदत

पुणे : डॉ. राजेंद्रप्रसाद विद्यामंदिर बोपोडी येथे महिलांसाठी आयोजित करण्‍यात आलेल्‍या मोफत आरोग्‍य तपासणी शिबीरास मुख्‍यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट देऊन पहाणी केली. 'आरोग्‍याचा चातुर्मास' ही अभिनव संकल्पना असून ‍या माध्‍यमातून प्रत्‍येक व्‍यक्‍तीपर्यंत आरोग्‍य सुविधा मोफत पोहोचवण्‍यात आली आहे. आमदार विजय काळे यांनी राबविलेला हा उपक्रम कौतुकास्‍पद असून असे उपक्रम राज्‍यभरात राबविण्‍यात यावेत.नागरिकांना आरोग्‍यविषयक सुविधा देण्‍यासाठी शासन प्राधान्‍य देत असून शासनाच्‍या आरोग्‍यविषयक विविध…
Read More...

१३ वर्षीय मुलीचा गर्भपात करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज १३ वर्षीय अल्पवयीन गर्भवतीला गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे. ८ सप्टेंबर रोजी हा गर्भपात केला जाईल . न्यायमूर्ती एस. ए. बोबडे आणि न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने ही परवानगी दिली आहे.३१ आठवड्यांच्या गर्भवती मुलीच्या आरोग्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक वैद्यकीय मंडळ नेमण्याचे आदेश दिले होते .या मंडळाने मुलीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर गर्भपातासाठी परवानगी देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
Read More...

आता पाणी वापराचेही होणार ऑडिट !

सांगली : राज्यातील पाणी प्रकल्प, सिंचन व बिगर सिंचन पाणी वापराचे लेखापरीक्षण करण्यात येणार असून पाणी वापर व उत्पन्न यात तफावत आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईसह फौजदारीही दाखल केली जाणार असल्याचा इशारा जल व सिंचन विभागाचे मुख्य लेखापरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी दिली. सांगली जिल्ह्यातही लवकरच पाणी ऑडिट सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यातील ३०८ लाख हेक्टर क्षेत्रापैकी २२५ लाख हेक्टर क्षेत्र लागवडी योग्य आहे. राज्याची पाण्याची वार्षिक उपलब्धता पाच हजार ७८४ टीएमसी इतकी आहे. पाण्याचे…
Read More...

देशभरात स्वाईन फ्लूमुळे १,१०० जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशभरात स्वाईन फ्लूमुळे १ हजार १०० जणांचा मृत्यू झाला असून यात महाराष्ट्रातील रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत ४४८ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात पाठोपाठ गुजरातचा क्रमांक लागतो. गुजरातमध्ये स्वाईन फ्लूमुळे ३४३ जणांचा मृत्यू झाला आहे.आरोग्य मंत्रालयाकडून स्वाईन फ्लूसंबंधी आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात तब्बल २२ हजार १८६ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. गुजरातमध्ये ४ हजार…
Read More...

देशभरात स्वाईन फ्लूमुळे १,१०० जणांचा मृत्यू; मृतांमध्ये महाराष्ट्रातील रूग्णांची संख्या सर्वाधिक

नवी दिल्ली : देशभरात स्वाईन फ्लूमुळे १ हजार १०० जणांचा मृत्यू झाला असून यात महाराष्ट्रातील रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत ४४८ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे . महाराष्ट्रात पाठोपाठ गुजरातचा क्रमांक लागतो. गुजरातमध्ये स्वाईन फ्लूमुळे ३४३ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून स्वाईन फ्लूसंबंधी आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात तब्बल २२ हजार १८६ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. गुजरातमध्ये ४…
Read More...

मिठाई दुकानातून १२० किलो हलवा केला जप्त

सोलापूर : दूध आणि खव्यापासून मिठाई बनवणे असताना दूध पावडर आणि चुकीच्या तेलांचा वापर करून मिठाई बनवल्याप्रकरणी सोलापूर शहर अन्न औषध प्रशासनाने विडी घरकुलमध्ये कारवाई केली.विडी घरकुल परिसरातील गोविंदराज मिठाई दुकानात ही कारवाई झाली. तब्बल २४ हजार रुपयांची १२० किलो हलवा मिठाई जप्त करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त संजय नारागुडे यांनी दिली आहे.या मिठाईत दूध, खवा किंवा अन्य घटक वापरणे गरजेचे होते. परंतु यात पावडर, इडीबल ऑइल यांचा वापर करून आकर्षक वेष्टनात ही मिठाई पॅक करण्यात आली होती. तसेच…
Read More...

पाच डायलिसिस युनिट लवकरच येणार…

सोलापूर : सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डायलिसिस युनिट सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. त्यानुसार आरोग्य विभागाकडून चार शासनाकडून एक असे एकूण पाच डायलिसिस युनिट लवकरच येणार आहेत. गरजूंना याचा लाभ होणार आहे. सिव्हिल आरोग्य विभागाकडून चार युनिट मिळतील.प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. येत्या दोन महिन्यांत आरोग्य विभागाच्या चार मशीन दाखल होतील. परंतु शासनाकडून मिळणाऱ्या मशीनला विलंब लागणार आहे. सप्टेंबर रोजी वैद्यकीय शिक्षण विभागाची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. डायलिसिस युनिट…
Read More...

अवयवदानाविषयी शाळांमधून प्रबोधन करण्याची आवश्यकता

सोलापूर : समाजामध्ये अवयवदान करण्यासंबंधी विविध गैरसमज, शंका आहेत. या शंकाचे शंकांचे होणे अवयवदानाला बळकटीकरण करण्यासाठी कार्यशाळेद्वारे प्रबोधन होणे गरजेचे आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मनातील शंका दूर झाल्यास ते सामान्य नागरिकांच्या मनातील शंका दूर करतील.त्यामुळे अवयवदान चळवळ वाढीस लागण्यास मदत होईल, असे प्रतिपादन अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांनी केले. डॉ. व्ही. एम. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्जरी विभाग वैद्यकीय संशोधन समितीतर्फे अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली आहे.…
Read More...

स्वाईन फ्ल्युबाबत नागरिकांनी घाबरुन न जाता प्रतिबंधात्मक खबरदारी बाळगावी – श्वेता सिंघल

सातारा : बऱ्याच दिवसानंतर स्वाईन फ्ल्युने सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. ही चिंतेची जरी बाब असली तरी लोकांनी घाबरुन न जाता स्वाईन फ्लूला प्रतिबंधक उपायाद्वारे रोखता येत असून वेळीच घेतलेल्या उपचाराने स्वाईन फ्ल्यू बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न स्वाईन फ्ल्युबाबत प्रतिबंधात्मक खबरदारी बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे.स्वाईन फ्ल्यू (एच 1 एन 1) हा विषाणूमुळे होणार आजार असून याचा संसर्ग एका माणसापासून दुसऱ्या माणसाला होतो. स्वाईन फ्ल्यू हा बरा…
Read More...