InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

Health

एरंडेल तेलाला अमृताची उपमा, काय आहेत फायदे

वेब टीम - एरंड ही वनस्पती अशी आहे की आने, फुले, साल, मुळी व लाकूड सर्व काही अत्यंत उपयुक्त आहे. एरंडाचे कोळसेसुद्धा काही प्रमाणात मसाल्यात घालतात. आरोग्यशास्त्रदृष्ट्या हे अत्यंत महत्त्वाचे. अशा वनस्पतीचा परिचय माहित असणे जरून आहे. एरंडेल तेलास अमृताची उपम दिली आहे. अंगास लावल्यास, पोटात घेण्यास डोके व तळ पायांना शांतता येण्याकरीता हे तेल अवश्य वापरतात. या तेलाच्या दिव्यानेसुद्धा डोळ्यांना थंडावा येतो. यामध्ये तांबडा अशा दोन जाती आहेत. दोन्हीहि जाती श्रेष्ठ आहेत.कमला ( कावीळ ) : सर्व शरीर…
Read More...

तीळगुळ खा आणी आरोग्यदायी रहा

नवीन वर्षाची सुरवात उत्साहाने आणि आनंदाने आपण करतो. त्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी येणारी मकरसंक्रांत सर्वांचाच आनंद द्विगुणित करते. सर्वांना प्रेमाने व आपुलकीने हा तिळगूळ देऊन तिळगूळ घ्या, गोड बोला' असे म्हणत स्नेह वाढवला जातो. थोडक्यात तिळगुळाचा गोडवा, त्यातला स्निग्धपणा प्रत्येकाच्या स्वभावात असावा आणि त्यातून प्रेमाची नाती जोडली जावीत, अशी त्यामागची भावना असते.गुणकारी तीळसंक्रांत ज्या ऋतूत येते, तो ऋतू म्हणजे शिशिर ऋतू! थंड बोचरा वारा या ऋतूत जाणवत असल्याने थंडी कमी करण्यासाठी उष्ण…
Read More...

अल्सर बद्दल माहिती

वेब टीम - अल्सर म्हणजे व्रण. आपल्याला अल्सर म्हटलं की पोटातील व्रण आठवतो. अल्सर होऊ न देणं हाच सर्वांत चांगला पर्याय असतो. अल्सरला प्रामुख्याने पित्त कारणीभूत ठरते. त्यामुळे पित्त वाढू नये, ते साठून राहू नये यासाठी काळजी घ्यायला हवी. त्याकरिता आयुर्वेदाने सांगितलेले पथ्य पाळणे व काळजी घेणे आवश्यक आहे.अल्सर याचा शब्दशः अर्थ आहे व्रण किंवा जखम. यावरून अल्सर कुठेही होऊ शकतो, हे लक्षात येऊ शकते. मात्र अमुक व्यक्तीला अल्सर आहे असे म्हटले, की त्याला पोटाशी संबंधित काहीतरी त्रास असावा असे लगेच कळते.…
Read More...

फायबरने परिपूर्ण : बहुगुणी रताळे

वेब टीम- रताळ्यामध्ये फायबरचे प्रमाण मुबलक असल्याने वेळी-अवेळी लागणार्या भूकेवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. फायबरमुळे रताळं खाल्ल्यानंतर खूप वेळ पोट भरलेले राहते तसेच भूकेवरही नियंत्रण मिळवता येते. एक मध्यम आकाराच्या रताळ्यामध्ये सुमारे चार ग्राम फायबर असते. म्हणूनच उपवासाच्या दिवसाव्यक्तिरिक्त ऐरवी रताळ्याचा आहारात समावेश करा.रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते : रताळ्यामध्ये कार्ब्सचे प्रमाण अधिक असले तरीही त्यामधून शरीराला adiponectin नामक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणार्या…
Read More...

लहान बाळांची कशी घ्याल काळजी

वेब टीम- आयुष्यात नुसत्या उंची व वजनावर यशस्वी होता येत नाही. वजन हे वाढीचे परिमाण असू शकत नाही. बाळाची दृष्टी तेज आहे का, बाळाचे कान सूक्ष्म ऐकू येईल असे बनत आहेत का, सूक्ष्म वास त्याला येतो की नाही, त्याला चव कळते की नाही, त्याची जागरूकता किती आहे, त्याचे मल-मूत्र विसर्जन कसे आहे, याही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात. त्यासाठी आईचे दूध तान्ह्या बाळाला द्यायला हवे. आईच्या दुधापाठोपाठ गाईचे दूध अप्रतिम समजले जाते.अन्नामुळे शरीर तयार होते असे आपण म्हणतो. बाळाने शरीर नीट धरावे, त्याचा योग्य…
Read More...

Rainy season and Ayurveda : आला पावसाळा तब्येत सांभाळा !

टीम महाराष्ट्र देशा : पावसाळ्यात शरीर आणि पचनशक्ती या दोहोंची ताकद कमी झालेली असते. त्यामुळे पावसाळ्यात अन्न पचायला हलके, उष्ण आणि कमी प्रमाणात घ्यावे. आले, लसूण, पुदिना, काळी मिरी यांचा स्वयंपाकात वापर करावा. पाणी गाळून आणि उकळून प्यावे. शक्यतो पायी चालणे टाळावे. तळलेले, मसालेदार, चमचमीत पदार्थ टाळावेत. कुळीथ सूप किंवा पिठलं स्वरुपात वापरावेत. सर्दीतापाचे प्रमाण या ऋतूत वाढते. अशा वेळी कडकडीत लंघन करावे. चांगली व खरी भूक लागल्यावर मुगाचे आले, मिरे घातलेले गरम सूप प्यावे. विश्रांती घ्यावी.…
Read More...

वैद्यकीय व्यवसायाचा कॉर्पोरेट धंदा

टीम महाराष्ट्र देशा : सध्याच्या युगात देशाची सुरक्षा जवान करतात, तसेच आपल्या आरोग्याची सुरक्षा फक्त डॉक्टरांच्या हातात असून, डॉक्टरांना समाजात विशेष महत्त्व आणि स्थान आहे. आपल्या देशात सर्व प्रकाराचे डॉक्टर्स उपलब्ध आहेत जसे की अॕलोपॕथिक, होमिओपॕथिक,आयुर्वेदीक तसेच विविध प्रकाराचे विशेष रोग तज्ञ. डॉक्टरांचे काम म्हणजे पेशंट नीट करणे विविध आजारातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे. मनुष्य देवा नंतर जर कुणावर विश्वास ठेवत असेल तर तो डॉक्टर होय. परंतु हाच तो डॉक्टर औषध कंपन्यांमुळे ग्रासला गेला आहे.…
Read More...

कुपोषण संपविण्यासाठी पोषण अभियान प्रभावीपणे राबवा : पंकजा मुंडे

नागपूर : कुपोषणाचा समूळ नायनाट करण्यासाठी आणि पिढी सशक्त बनविण्याकरिता राज्यात पोषण अभियान कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.महिला व बाल विकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई तर्फे सिव्हील लाईन्स परिसरातील हिस्लॉप कॉलेज जवळील चिटणवीस सेंटर येथे आयोजित राज्यस्तरीय पोषण अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.मंचावर महिला व बालविकास राज्यमंत्री…
Read More...

डेक्कन कॉर्नर येथे पहिल्या ई-टॉयलेटचे महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन

 पुणे : लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड यांच्याकडून महिलांसाठी शहरात १० ई-टॉयलेट आणि १०० शाळांमध्ये स्मार्ट बोर्ड (इंटरॅक्टिव्ह) बसविण्यात येणार आहेत. त्यातील पहिले ई-टॉयलेट डेक्कन कॉर्नर येथे येत्या मंगळवारी (दि. १७) बसविण्यात येणार आहे. या ई-टॉयलेटचे उद्घाटन दुपारी १.३० वाजता पुण्याच्या महापौर मुक्ताताई टिळक यांच्या हस्ते होणार आहे. लायन्स क्लबचे प्रांतपाल रमेश शहा, माजी आंतरराष्ट्रीय संचालक प्रेमचंद बाफना, शोभा धारिवाल आदी प्रमुख अतिथी म्हणून यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती लायन्स क्लब ऑफ…
Read More...

जबड्याच्या सांध्यातील गुंतागुंतीच्या ट्युमर शस्त्रक्रियेतून 21 वर्षीय काश्मिरी रूग्णाची सुटका !

पुणे : जम्मू-काश्मीरमधील 21 वर्षीय रुग्ण मुलीच्या जबड्याच्या सांध्यातील ट्युमरवरील दुर्मिळ, अवघड शस्त्रक्रिया पुण्यातील ‘एम.ए.रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस अॅण्ड रिसर्च सेंटर’मध्ये यशस्वीरित्या पार पडली.डॉ. जे.बी.गार्डे (एम.ए.रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेसच्या) 'ओरल अॅण्ड मॅक्सिलोफेशिअल' चे विभाग प्रमुख यांनी दिनांक 9 जुलै रोजी सलग सहा तास ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. आज ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे रिपोर्ट आले.या दुर्मिळ शस्त्रक्रियेमध्ये डॉ. जे.बी.गार्डे यांना…
Read More...