Healthy Skin | त्वचेला निरोगी ठेवायचे असेल, तर आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Healthy Skin | टीम कृषिनामा: बदलत्या जीवनशैलीमुळे आणि पोषक आहाराच्या अभावामुळे त्वचेवरील चमक दिवसेंदिवस कमी होत जाते. त्वचेला चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. यासाठी लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेले वेगवेगळे उत्पादन वापरतात. पण ही उत्पादन त्वचेला दीर्घकाळ निरोगी ठेवू शकत नाही. त्वचेला दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात बदल करू शकतात. यासाठी तुम्ही पुढील गोष्टींचा तुमच्या आहारात समावेश करू शकतात.

टोमॅटो (Tomato For Healthy Skin)

टोमॅटो आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्याचबरोबर टोमॅटो त्वचेची काळजी घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. टोमॅटोमुळे त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते. टोमॅटोमध्ये उपलब्ध असलेले गुणधर्म त्वचेवरील डाग दूर करण्यास मदत करतात. त्यामुळे टोमॅटोचे सेवन करणे त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते.

गाजर (Carrot For Healthy Skin)

गाजर हे त्वचेसाठी सुपरफुड मानले जाते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्ही गाजराचे सेवन करू शकतात. गाजरामध्ये भरपूर प्रमाणात पाणी आढळून येते. त्यामुळे गाजराचे नियमित सेवन केल्याने त्वचा हायड्रेट राहते. परिणामी त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार होते.

बीट (Beetroots For Healthy Skin)

बीटरूट आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण यामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. त्वचेवरील ट्रेनिंग दूर करण्यासाठी बीटरूट उपयुक्त ठरू शकते. त्याचबरोबर बीटरूटचे नियमित सेवन केल्याने त्वचेवरील चमक वाढण्यास मदत होते. निरोगी ओठांसाठी बीटरूटचे सेवन करणे अधिक फायदेशीर मानले जाते.

भोपळा (Pumpkin For Healthy Skin)

भोपळ्याचे सेवन त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते. कारण यामध्ये विटामिन ई आणि विटामिन सी भरपूर प्रमाणात आढळून येते. नियमित भोपळ्याचे सेवन केल्याने आपली त्वचा अतिनील किरणांपासून सुरक्षित राहू शकते. नियमित भोपळा खाल्ल्याने त्वचेवरील चमक वाढू शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या