बीड जिल्हा परिषदेच्या मतदानाबाबत आज सुनावणी !

बीड जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्ष – उपाध्यक्षांच्या निवडी 4 जानेवारीला होणार आहे. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजप या दोन्ही बाजूंनी जोरदार तयारी केली आहे. त्यातच अपात्र ठरविलेल्या त्या पाच सदस्यांच्या मतांच्या अधिकाराबाबत 2 जानेवारीला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे. या निर्णयावरही जिल्हा परिषदेच्या सत्तेचे समीकरण ठरणार आहे.

पूर्वी ही सुनावणी 16 जानेवारीला होणार होती; परंतु अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवडणूक अगोदर होणार असल्याने आता सुनावणी आज होत आहे. जिल्हा परिषदेत सध्या 53 सदस्य असून सत्ता भाजपची आहे. पावणेतीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपला कमी जागा मिळाल्या होत्या. मात्र, त्यावेळी शिवसंग्राम, शिवसेना, कॉंग्रेस आणि तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते सुरेश धस गटाच्या पाच सदस्यांच्या साथीने भाजपने सत्ता मिळविली होती.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात राज्यासह देशभरात एल्गार

Loading...

राष्ट्रवादीचे गटनेते बजरंग सोनवणे यांचा व्हीप डावलून धस गटाच्या पाच सदस्यांनी भाजपला मतदान केले होते. तर, जयदत्त क्षीरसागर समर्थक असलेल्या मंगल डोईफोडे निवडीवेळी अनुपस्थित होत्या. त्यामुळे या सहा सदस्यांना अपात्र करण्याची याचिका राष्ट्रवादीने तत्कालीन जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांच्याकडे दाखल केली होती. श्री. सिंह यांनी या सहा सदस्यांना अपात्र ठरविले होते. याविरोधात या सदस्यांनी तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या अर्धन्यायिक न्यायालयात धाव घेतली.

पंकजा मुंडे यांनी यातील अश्विनी निंबाळ (आष्टा, ता. आष्टी) यांना सदस्यत्व बहाल केले, तर मंगल डोईफोडे (पिंपळनेर, ता. बीड), प्रकाश कवठेकर (डोंगरकिन्ही), अश्विनी जरांगे (अंमळनेर, ता. पाटोदा) व शिवाजी पवार (पाडळी, ता. शिरूर कासार) आणि संगीता महारनोर (धानोरा, ता. आष्टी) यांना अपात्र ठरविले. दरम्यान, याविरोधात या पाच सदस्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली.

ठाणे जिल्हा पुरूष/ महिला प्रीमियर लिग कबड्डी स्पर्धेची घोषणा

न्यायालयाने अपात्रतेचा निर्णयाला स्थगिती दिली परंतु मतांचा अधिकार मात्र नाकारला. अध्यक्ष – उपाध्यक्षांच्या निवडी असल्याने मतांचा अधिकार देण्याची विनंती वरील सदस्यांनी केली होती. त्यावर खंडपीठाने ता. 16 डिसेंबर ही सुनावणीची तारीख देत “या निर्णयाच्या अधीन राहून निवडी कराव्यात’ असे निर्देश दिले होते. परंतु पुनर्विचार अर्जानंतर आता यावर आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.