InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयात बंडखोर आमदारांच्या याचिकेवर आज सुनावणी

- Advertisement -

कर्नाटक काँग्रेस-जेडीएस सरकारपुढील संकट अधिक गडद होत आहे. आज सर्वोच्च न्यायालयात बंडखोर आमदारांच्या याचिकेवर सुनावणी होईल. काँग्रेस-जेडीएसच्या १० बंडखोर आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी होणार आहे, याकडे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, कर्नाटक विधानसभा पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. काँग्रेस आणि जेडीएसच्या सर्व आमदारांना पक्षातर्फे व्हिज जारी करण्यात आला आहे. तर राजीनामा देत बंडखोरी करणारे आमदार विधानसभेचे सभापती रमेश कुमार यांची भेट घेऊन बंगळुरुतून पुन्हा मुंबईत परतले आहेत.

कर्नाटकातील राजकीय नाट्य संपण्याचे नाव घेत नाही. सत्तासंघर्ष अद्याप सुरुच आहे. बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर त्याचा काय निकाल लागतो, याची उत्सुकता आहे. दरम्यान, सर्व बंडखोर आमदारांनी कर्नाटकात विधानसभा अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा बंडखोर आमदार मुंबईत दाखल झालेत.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.