Heatwave Alert | तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पार, ‘या’ भागांना हवामान खात्याकडून सतर्क राहण्याचा इशारा

Heatwave Alert | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा (Mercury of temperature) दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमामध्ये उष्माघातामुळे 13 जणांचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने राज्यातील काही भागांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

‘या’ ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता (Chance of heat wave at ‘this’ place)

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची (Heatwave Alert) शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी उष्णताची तीव्रता कमी होईपर्यंत बाहेर पडू नये, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. त्याचबरोबर नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन देखील हवामान  खात्याकडून करण्यात आले आहे.

‘या’ भागांना हवामान खात्याकडून सतर्क राहण्याचा इशारा (The Meteorological Department warned these areas to be alert)

रत्नागिरी, ठाणे, पुणे, सोलापूर, रायगड, धाराशिव, नांदेड, लातूर, हिंगोली, अमरावती, नागपूर, वर्धा, धुळे, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा (Heatwave Alert) 40 अंश सेल्सिअसच्या पार जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घ्या (Take care of health in summer)

दरम्यान, उन्हाचे चटके चांगलेच जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. उन्हाळ्यात काळजी घेण्यासाठी जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करून शरीर हायड्रेट ठेवा. उन्हाळ्यात लिंबू पाणी, सरबत, ज्यूस इत्यादी गोष्टी प्या. त्याचबरोबर घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घेऊनच बाहेर पडा.

महत्वाच्या बातम्या