InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस

नाशिक जिल्ह्यावर वरुणराजाची कृपा गेल्या आठवड्यापासून  कायम आहे . नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात बुधवारी रात्रीपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्र्यंबक तालुक्यात रात्रीतून १२७ मिमी पाऊस पडल्याने माेखाडा गावाकडे जाणारा रस्ता खचून केला. वैतरणा धरणाजवळ वीजनिर्मिती केंद्रावर दरड काेसळल्याने या केंद्रामध्ये पाणी शिरले हाेते. दरम्यान, नाशिक शहराकडे मात्र गुरुवारी दिवसभर पावसाने पाठ फिरवली.

त्र्यंबकेश्वर शहरातील रस्ते जलमय झाले हाेते. शहरात कुंभमेळ्यानिमित्त रस्त्यांचे, नद्याचे काँक्रिटीकरण झाले असल्यामुळे नाल्यांमधील पाणी रस्त्यांवर साचतआहे . ज्याेतिर्लिंग मंदिरातही पाणी शिरले हाेते, तसेच मंदिर परिसरातील बाजारपेठेच्या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यामुळे दुकाने बंदच ठेवावी लागली. गाेदावरी नदीला पूर येऊन अनेक घरांत पाणी शिरले हाेते.इगतपुरी परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कसारा घाटात हिवाळा ब्रिजजवळील बोगद्यावरील डोंगराच्या मातीचा ढिगारा रेल्वे रुळांवर काेसळला.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply