InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मुंबई आणि उपनगरात येत्या 24 तासांत अतिवृष्टी

मुंबईवर अस्मानी संकट येण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी मुंबईकरासाठी हाय अलर्ट जारी केला आहे. 200 मिली पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.

आज ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची तर मुंबईत अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई आणि उपनगरात येत्या 24 तासांत बरसणारा हा पाऊस जोरदार आहे. त्यामुळे अतिमुसळधार पावसामुळे पोलिसांनी मुंबईकरांना शक्य असेल तरच घराबाहेर पडा अशा सुचना केल्या आहेत.

सोमवारी झालेल्या पावासमुळे मुंबईच्या अनेक भागांमध्ये खूप पाणी साचलं होतं. रेल्वे स्थानकांत पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वे धिम्यागतीने सुरू होती.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply