InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; ४३ लोकांचा मृत्‍यू तर २४ जण बेपत्‍ता

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस आणि त्‍यामुळे झालेल्‍या भूस्‍खलनात ४३ लोकांचा मृत्‍यू झाला आहे. तसेच २४ जण यामध्ये बेपत्‍ता आहेत. तर २० लोक जखमी झाल्‍याचे वृत्‍त आहे. यामध्ये आतापर्यंत ५० पेक्षा अधिक लोकांना वाचवण्यात यश आहे. नेपाळमध्ये जोरदार पावसामुळे अनेक भागात पुराचे पाणी आले आहे. अशा आपत्‍तीच्या प्रसंगी बचाव पथकाकडून शोध मोहिम, मदत पोहचविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

राजधानी काठमांडूध्येही पुराच्या पाण्यामुळे अनेक भाग जलमय झाले आहेत. या पुरामध्ये एकाच कुटुंबातील तीन सदस्‍यांचा मृत्‍यू झाला आहे. काठमांडूमध्ये घराची भींत पडल्‍याने या खाली सापडून यांचा मृत्‍यू झाल्‍याचे समोर आले आहे. तसेच पूर्व खेतांग जिल्‍ह्‍यात भूस्‍खलनात तीन लोकांचा मृत्‍यू झाला आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply